

Nashik News : नाशिक जिल्हा रुग्णालयातील औषध खरेदी प्रक्रियेत सुमारे ४ कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करत विरोधकांनी विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले. 2024 -25 मध्ये झालेल्या या औषध खरेदीवर तत्कालीन अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवल्यानंतरही एकाच कंपनीकडून औषधांची खरेदी करण्यात आली. यावर आरोग्य विभागाकडून समाधानकारक उत्तर न आल्याने चौकशीची मागणी करण्यात आली.
या गंभीर प्रश्नावर आरोग्य विभागाकडून उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकाराची दखल घेत सभापती राम शिंदे यांनी या प्रकरणाची माझ्या स्तरावर सखोल चौकशी करून वस्तुस्थिती सभागृहासमोर ठेवली जाईल, असे निर्देश दिले.
प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यावर या प्रश्नावर आरोग्य विभागाकडून उत्तर प्राप्त न झाल्याने आमदार अनिल परब यांनी संताप व्यक्त केला. यावेळी सभापतींनी प्रश्नांची उत्तरे सदस्यांना वेळेवर न मिळणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खरी परिस्थिती सभागृहाला अवगत केली जाईल, असे सभापतींनी स्पष्ट केले.
तारांकित प्रश्नाद्वारे हा मुद्दा मांडताना आमदार पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांनी - प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे - निदर्शनास आणून दिले. निविदा प्रक्रिया पूर्ण - होण्यापूर्वीच आणि तांत्रिक मान्यतेमधील विसंगती असतानाही एकाच कंपनीकडून औषधांची खरेदी केल्याचा ठपका त्यांनी ठेवला. (Nashik)
तत्कालीन अधिकाऱ्यांनी खरेदी फाईलवर नोंदवलेले तांत्रिक आक्षेप आणि निविदा क्रमांकात आढळलेली मोठी तफावत हे या गैरव्यवहाराचे मुख्य केंद्र आहे. कारण खरेदी करताना जेम पोर्टलवर तांत्रिक मान्यतेसाठी वेगळा निविदा क्रंमाक आणि पुरवठा आदेशासाठी वेगळा निविदा क्रंमाक वापरला गेला होता. तसेच, औषध खरेदीसाठी आवश्यक असलेली रीतसर प्रशासकीय मान्यता मिळण्यापूर्वीच घाईगडबडीत राबवण्यात आलेली खरेदी प्रक्रिया आणि विशिष्ट कंपनीलाच झुकते माप देण्याचे धोरण यांमुळे संपूर्ण प्रक्रियेवरच संशयाचे दाट सावट निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.