Nashik MIDC News: ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर आरोप केले. त्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला. आता त्यांनी एमआयडीसी प्रशासना विरोधात मोर्चा वळवला आहे.
नाशिक शहरातील अंबड येथील शांतीनगर झोपडपट्टीचे अवैध अतिक्रमण काढण्यात आले. एमआयडीसी आणि महापालिका अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. हे प्रकरण सध्या राजकीय वादाचा विषय ठरले आहे. त्यात आता ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे.
शांतीनगर झोपडपट्टी विरोधातील कारवाईच्या निषेधार्थ स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. आता त्यांनी ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे धाव घेतली. ॲड सदावर्ते यांनी झोपडपट्टीवासीयांची बाजू घेत उद्योग विभागाला धारेवर धरले.
ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर बेछूट आरोप केले. अतिक्रमण निर्मूलन कारवाई केल्याने सामंत यांनी झोपडपट्टीवासीयांवर अन्याय केला आहे. त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल असा इशारा दिला होता.
आता ॲड सदावर्ते यांच्या सुचनेवरून नागरिकांनी शहराच्या सातपूर पोलीस ठाण्यात एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या विरोधात 600 हून अधिक तक्रारी केल्या. झोपडपट्टी धारक नागरिकांच्या नावाने या तक्रारी आहेत. काल दिवसभर पोलीस ठाण्यात हे एकच काम सुरू असल्याने पोलीस यंत्रणेवरही दबाव आला होता.
सदावर्ते यांच्या सांगण्यावरून नागरिकांनी सातपूर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती. कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रारींचा पाऊस पडला. त्यामुळे हा प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची कुजबुज यावेळी सुरू होती.
ॲड सदावर्ते यांनी हे प्रकरण राज्य शासनाकडे नेणार असल्याचे म्हटले आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अतिक्रमण निर्मूलन कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या सहाशे तक्रारी हा पोलीस ठाण्यातही चर्चेचा विषय ठरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.