MLC Election : नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे बंडही शमले; गोकुळ गिते मात्र अडून बसले, हॉटेलात झालेल्या त्या बैठकीत काय ठरलं?

Nashik MLC Election : नरेंद्र दराडे यांचे अर्धे टेन्शन मिटले आहे. गणेश गिते माघार घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनीही माघार घेतली आहे. आता नरेंद्र दराडे यांच्यापुढे केवळ गोकूळ गितेयांचे आव्हान उरले.
Ganesh Gite, Narendra Darade
Ganesh Gite, Narendra DaradeSarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर मित्रपक्ष असलेल्या भाजपसह राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे मोठे आव्हान उठे ठाकले होते. भाजपचे गणेश गिते, गोकूळ गिते तसेच राष्ट्रवादीचे गोरख बोडके व विष्णूपंत म्हैसधुणे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

पैकी शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय व भाजपचे माजी स्थायी समतीचे सभापती गणेश गिते यांचे होते. मात्र, आता मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत गणेश गिते यांना माघार घेण्यासाठी तयार केलं आहे. साधरण दोन वाजेपर्यंत गणेश गिते हे कलेक्टर ऑफिसला पोहचणार असून वरिष्ठांच्या सूचना आल्याबरोबर आपला उमेदवारी अर्ज माघारी घेणार असल्याचे गिते यांनी सांगितले आहे.

तसेच राष्ट्रवादीचे गोरख बोडके व विष्णूपंत म्हैसधुणे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नरेंद्र दराडे यांनी अर्धी लढाई जिंकली आहे. पंरतु गणेश गिते यांचे बंधू गोकूळ गिते आजूनही उमेदवारी करण्यावर अडून बसले आहे. ते कोणाच्याही संपर्कात नसून नॉट रिचेबल आहे. नरेंद्र दराडे यांच्यासमोर आता केवळ गोकूळ गिते यांचे आव्हान राहिले आहे. त्यामुळे गोकूळ गिते यांच्या भूमिकेवर निवडणुकीची पुढची दिशा ठरणार आहे.

Ganesh Gite, Narendra Darade
Jalgaon MLC Election : बालेकिल्ल्यातच महाजनांच्या डोक्याला ताप; शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे नॉट रिचेबल, अर्ज मागे न घेण्यावर ठाम

दरम्यान नाशिकमध्ये एका हॉटेलात शिवसेना नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, उमेदवार नरेंद्र दराडे व त्यांचे बंधू किशोर दराडेही उपस्थिती होते. विशेष म्हणजे गणेश गिते यांचीही या हॉटेलात एण्ट्री झाली. त्यामुळे आत नेमके काय खलबते झाले ते कळू शकलेले नाही. परंतु बाहेर आल्यावर आपण केवळ सुहास कांदे यांना भेटण्यासाठी आलो होता. बैठकीसाठी आलो नाही. सुहास कांदे यांच्याशी गप्पा मारल्या असं माध्यमांशी बोलताना गिते यांनी सांगितलं.

Ganesh Gite, Narendra Darade
Nashik MLC Election: सर्व १४ अर्ज वैध! शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंचं आव्हान कायम

माझ्या नेत्यांचा निरोप आला की माघार घेणार आहे. २ वाजेपर्यंत कलेक्टर ऑफिसला पोहचले. गोकूळ गिते यांच्याशी संपर्क केला पण तो झाला नाही. गोकूळ माघार घेणार आहे की नाही त्याची कल्पना नाही. अशी माहिती गणेश गिते यांनी दिली. दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी गोकूळ गिते हे देखील माघार घेतील असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे गोकूळ गिते हे केवळ मंत्री महाजनांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com