Nashik MLC: खासदारांच्या बंडखोरीने विधान परिषद उमेदवाराच्या तोंडचं पाणी पळालं? मतदानाच्या दिवशी नाशिक महायुतीच्या गोटात कमालीची शांतता!

Nashik MLC voting Shivsena UBT Corporators await Uddhav Thackeray's order: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना विधान परिषद मतदानासाठी मातोश्रीच्या आदेशाची प्रतीक्षा.
Gokul Gite & Narendra Darade
Gokul Gite & Narendra DaradeSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti camp silent on Nashik voting day: नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सहा खासदारांनी बुधवारी स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. शिवसेनेसह महाविकास आघाडीतील मतदारांमध्ये त्याबाबत संताप आहे.

नाशिक मतदारसंघात महायुतीचे नरेंद्र दराडे यांना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने उमेदवारी दिली आहे. महायुतीकडे भाजपसह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे ४६६ हून अधिक मतदार आहेत. त्यामुळे पक्षाचा आदेश पाळला गेल्यास उमेदवारी नरेंद्र दराडे निर्धास्त होते.

मात्र काल शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने उद्धव ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांना फोडले. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया मतदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटले आहेत. हा संताप मतदानातून व्यक्त होण्याची शक्यता आहे.

Gokul Gite & Narendra Darade
Nashik MLC Election: नाशिकच्या जागेवर महायुतीत खलबतं; भाजप शिवसेनेला देणार ‘हा’ पर्याय?

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना मतदान करण्याबाबत अद्याप आदेश आलेला नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी यासंदर्भात मुंबईला वरिष्ठांची संपर्क केला आहे. तासाभरात याबाबत मातोश्री येथून आदेश येण्याची शक्यता आहे.

Gokul Gite & Narendra Darade
Nashik: भाजप बंडखोर गोकुळ गितेंच्या मागे उद्धव ठाकरेंची ताकद? एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाडण्यासाठी नाशिकमध्ये हालचाली

शिवसेना ठाकरे पक्षातील फूट पडल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया नगरसेवकांमध्ये आहे. नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्यावर दबाव आणून भाजपने माघार घेण्यास भाग पाडले. गोकुळ गीते यांनी आपण प्रचार थांबत आहोत मात्र दराडे यांना पाठिंबा देणार नाही असे जाहीर केले होते.

गेले काही दिवस भाजपने माघारी साठी प्रतिष्ठेचा विषय केला होता. त्यासाठी विविध दबाव तंत्रांचा वापर करण्यात आला. पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणेचाही दबाव निर्माण झाल्याने गीते यांनी प्रचार थांबवला होता.

या राजकीय पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षात पडलेली फुट गीते यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नगरसेवक गीते यांना मतदान करू शकतात. मालेगाव येथील इस्लाम पक्षाच्या नगरसेवकांनी अपक्ष गीते यांना सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या दिल्या होत्या. मालेगाव येथील इस्लाम आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष महायुती विरोधात राहिले आहेत.

भाजपने आपल्या सदस्यांसाठी व्हीप बजावला आहे. मात्र गुप्त मतदान असल्याने त्याचा कितपत प्रभाव पडेल याविषयी पक्षाचे नेतेही शासनक आहेत. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांना कांजूर येथील रिसॉर्टवर ठेवण्यात आले होते.

हे नगरसेवक तासाभरात मतदानासाठी नाशिकला पोहोचतील. त्यानंतर दिवसभर मतदानादरम्यान काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राजकीय घडामोडी अपक्ष उमेदवार गीते यांनी मनावर घेतल्यास त्यांच्या पथ्यावर पडू शकतात. त्यामुळे महायुतीचे नरेंद्र दराडे यांच्या चिंतेत भर पडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com