Nashik MLC Election: नाशिकच्या जागेवर महायुतीत खलबतं; भाजप शिवसेनेला देणार ‘हा’ पर्याय?

Nashik Vidhan Parishad News: नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेनेला तडजोडीचा पर्याय देण्याची शक्यता आहे. महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Nashik Vidhan Parishad News
Nashik Vidhan Parishad NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जागा वाटपाचा गंभीर पेच आहे. यासंदर्भात ठाणे आणि जळगाव येथील जागेची अदलाबदल करण्याचाही प्रस्ताव आहे. शिवसेनेतील नेत्यांना आपल्या कुटुंबीयांना स्थिरस्थावर करण्याची चिंता आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आहे. भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून डावपेच आखत आहे. त्यामुळे भाजपकडून शिवसेना शिंदे पक्षावर राजकीय दबाव येण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामध्ये मंत्री आणि नेत्यांना आपल्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीकडे शिवसेना शिंदे पक्षाचे सर्वच नेते याच दृष्टीने पाहत आहेत. त्यामुळे इच्छुकांचा आणि कार्यकर्त्यांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिक मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाकडे तुल्यबळ मतदारसंख्या आहे. हा विकास आघाडीकडे नगण्य संख्याबळ आहे. त्यामुळे आघाडीतील पक्ष लक्ष्मी दर्शनाच्या प्रभावाने फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी निवडणुकीत प्रभावहीन आहे.


Nashik Vidhan Parishad News
Pune Police News: जो गुन्हा केलाच नाही, त्यात शरद पवारांच्या नेत्याला अटक! पुणे पोलिसांच्या कारभारावर सवाल

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 619 मतदार आहेत. यातील ४६६ मतदारसंख्या महायुतीची आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मतदार संख्या शंभराच्या आसपास आहे. त्यामुळे आघाडी विरुद्ध युती अशी लढत झाल्यास ही निवडणूक एकतर्फी होणार आहे.


Nashik Vidhan Parishad News
Prasad Lad Meet Manoj Jarange: प्रसाद लाड यांच्या तोंडावरच मनोज जरांगेंकडून शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे कौतुक!

भारतीय जनता पक्षाकडे 188 नगरसेवक आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडे त्या खालोखाल १७१ सदस्य संख्या आहे. त्यामुळे मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना आमदार करण्याचे डोहाळे लागले आहेत. स्थितीत मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय सर्वाधिक चर्चेत आहे. त्यामध्ये वरिष्ठांच्या छुप्या आशीर्वादाने समजून-उमजून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com