Graduate Teacher Elections : लोकसभेच्या निकालानंतर लगेच मोठी निवडणूक, 'पैठणी'चे प्रकरण पुन्हा चर्चेत

Nashik constituency : अप्पासाहेब शिंदे, भाऊसाहेब कचरे आणि सुनील पंडित असे नगर जिल्ह्यातील तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, नाशिकच्या किशोर दराडेंनी बाजी मारली. या निवडणुकीत शिक्षिकांना व शिक्षकांच्या कुटुंबीयांना पैठण्यांचे वाटप झाल्याची जोरदार चर्चा होती.
Graduate Teacher Elections
Graduate Teacher ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Political News : चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकला जाहीर होईल. त्यानंतर महाराष्ट्रात आणखी एक निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ Mumbai Teacher Constituency अशा 4 जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी 10 जून 2024 रोजी मतदान होणार आहे.

Graduate Teacher Elections
Loksabha Election 2024 : श्रीकांत शिंदेंसाठी कलानी, आयलानी एकवटले; लांडगेंना हॅटट्रिकचा विश्वास

2018 मध्ये याच निवडणुकी Election दरम्यान नगर जिल्ह्यात जिल्ह्यात झालेले पैठणींचे वाटप गाजले होते. आता पुन्हा ही निवडणूक जाहीर झाल्याने यंदा पुन्हा पैठणी प्रकरणावर चर्चा होणार की नवीन प्रकरण गाजणार याची उत्सुकता आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे Niranjan Davkhare (कोकण पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

या निवडणुकीसाठी 15 मे रोजी अधिसूचना जारी केली जाईल. 22 मे पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. छाननी 24 मे रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 27 मे आहे. 10 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. 13 जून 2024 रोजी मतमोजणी होईल.

नगर जिल्ह्याला 37 वर्षे प्रतिनिधित्त्व नाही

नाशिक शिक्षक मतदार संघात 1981 ते 87 या काळात नगर जिल्ह्याचे रा. ह. शिंदे आमदार होते. त्यानंतर नगर जिल्ह्यातून या मतदारसंघात कोणीही आमदार झाले नाहीत. आमदार रा. ह. शिंदे यांचे चिरंजीव अप्पासाहेब शिंदे इच्छुक आहेत. मागील 2018 च्या निवडणुकीत अप्पासाहेब शिंदे, भाऊसाहेब कचरे व सुनील पंडित असे जिल्ह्यातील तीन उमेदवार होते. मात्र, नाशिकच्या किशोर दराडेंनी बाजी मारली. या निवडणुकीत शिक्षिकांना व शिक्षकांच्या कुटुंबीयांना पैठण्यांचे वाटप झाल्याची जोरदार चर्चा होती. या पैठण्यांमुळे निकाल फिरल्याचेही बोलले जाते. त्यामुळेच यंदा पैठणी निवडणूक गाजवणार की अन्य काही, याची उत्सुकता आहे. नाशिक विभागातील नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव या पाच जिल्ह्यात या निवडणुकीचे 65 हजार मतदार असून यापैकी 15 हजार मते नगर जिल्ह्यातील आहेत.

(Edited By Roshan More)

Graduate Teacher Elections
Lok Sabha Election 2024: शरद पवार काँग्रेसमध्ये जातील अन् ठाकरे गटात फक्त..., नेमकं काय म्हणाले शिरसाट?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com