Nashik News : 'महापालिका मुंबईसारख्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?', काँग्रेस नेते संतापले

Congress Politics : धोकादायक जाहिरात फलकांबाबत महापालिकेने तातडीने संरचनात्मक सर्वेक्षण करण्याची गरज आहे, असे बागुल यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Congress News : मुंबईत घाटकोपर येथे जाहिरात फलक कोसळला. या दुर्घटनेत 14 जणांना प्राण गमवावे लागले. याबाबत राज्य शासनाने विविध घोषणा केल्या आहेत. महापालिका त्यांच्या परिसरातील धोकादायक फलकांवर कारवाई करत आहेत. मात्र, त्यातुलनेत नाशिक महापालिकेने उपाययोजना केल्याचे दिसत नाही, असा थेट आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहित केला आहे.

सध्या पावसाळ्याचे वातावरण आहे. पाऊस सुरू झाल्यावर अनेक दुर्घटना घडतात. त्याविषयी महापालिका Nashik Corporation प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मात्र सूचना करूनही प्रशासन याबाबत उदासीन असल्याची टीका बागुल यांनी केली आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फलक आहेत. यातील अनेक फलक असुरक्षित व धोकादायक आहेत. वर्दळीचा परिसर आणि महत्त्वाच्या रस्त्यांवरील या जाहिरात फलकांची तातडीने तपासणी आणि सर्वे करण्याची गरज आहे.

Nashik Municipal Corporation
Porsche Crash Case : पुण्यातील 'हिट अँड रन' केसचे पडसाद नाशिकमध्ये, काँग्रेसकडून अनोख्या निबंध स्पर्धेचं आयोजन

धोकादायक जाहिरात फलकांबाबत महापालिकेने तातडीने संरचनात्मक सर्वेक्षण करण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे Congress माजी नगरसेवक बागुल यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.या संदर्भात महापालिकेतील ठेकेदार आणि कर्मचारी यांनी योग्य कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी.

बेकायदेशीर बांधकामांबाबत असलेल्या नियमांची अंमलबजावणी मोबाईल टॉवर बसविलेल्या इमारतींवर करण्यात यावी. खासगी आणि शासकीय अशा दोन्ही जागांवरील जाहिरात फलक व अनधिकृत बांधकामे याविषयी संरचनात्मक सर्वेक्षण तातडीने होणे गरजेचे आहे.

त्यापासून नागरिकांना धोका संभवू शकतो. त्यामुळे अशी कार्यवाही करणे ज्यांची जबाबदारी आहे. अशा अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी स्वतः पुढाकार घेऊन कारवाई करावी, असे बागुल यांनी म्हटले आहे.

आंदोलनाचा इशारा

मुंबईत घाटकोपर येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यातील विविध महापालिकांनी तातडीने शहरातील जाहीर फलकांचा आढावा घेतला होता. तसे काहीही नाशिक महापालिकेने केलेले नाही, असा आरोप काँग्रेसचे नेत्यांनी करत संताप व्यक्त केला आहे.

महापालिकेला ठराविक कामांतच रस आहे. नागरिकांच्या जीवाला धोका संभवणाऱ्या महत्त्वाच्या विषयांवर प्रशासन शांत बसून आहे. त्यांनी तातडीने हालचाली न केल्यास काँग्रेस आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Nashik Municipal Corporation
Pune Porsche Accident : अजय तावरेचा विशाल अगरवालला सल्ला; रक्त बदलले, तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com