Porsche Crash Case : पुण्यातील 'हिट अँड रन' केसचे पडसाद नाशिकमध्ये, काँग्रेसकडून अनोख्या निबंध स्पर्धेचं आयोजन

Pune Porsche Crash Case: पुण्यातील 'हिट अँड रन' केस मुळे प्रशासनातील भ्रष्ट व्यवस्था आणि राजकारण्यांची युती उघड झाली आहे. या प्रकरणाचा नाशिकमधील काँग्रेसकडून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला आहे.
Nashik Congress
Nashik CongressSarkarnama
Published on
Updated on

Nashik Congress On Pune Hit and Run Case: पुण्यातील 'हिट अँड रन' केस मुळे प्रशासनातील भ्रष्ट व्यवस्था आणि राजकारण्यांची युती उघड झाली आहे. या प्रकरणाचा नाशिकमधील काँग्रेस (Nashik Congress) नेते आणि कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात या प्रकरणाचा निषेध करण्यात आला.

दोन जीव गमावल्यानंतरही पोलिसांपासून ते सत्ताधारी राजकीय नेते आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरदेखील दोषी युवकाला वाचविण्यासाठी सक्रिय होते. त्यात सर्व यंत्रणा व अधिकारी भ्रष्ट झाले. हे यानिमित्ताने उघड झाले. दोन निष्पापांचा जीव पैशापुढे मातीमोल ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) पक्षाच्या वतीने पुण्यातील सत्ताधारी राजकीय नेते, पोलिस आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी एक निबंध स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या निबंध स्पर्धेतील विषयात, माझी आवडती कार पोर्शे (Porsche Car) फरारी, मर्सडीज की इतर, दारूचे दुष्परिणाम, नियम पाळा अपघात टाळा, आजची तरुण पिढी आणि व्यसनाधीनता, माझा बाप बिल्डर असतात तर?, मी पोलीस अधिकारी झालो तर..?? भारतात खरंच कायद्यापुढे समानता राहिली आहे का? अश्विनी कोष्टा व अनिष अवधिया यांचे खरे मारेकरी कोण? असे विषय या स्पर्धेसाठी निवडले आहेत.

अशा अनोख्या पद्धतीने काँग्रेसकडून राज्यातील तसेच पुणे (Pune) शहरातील सत्ताधारी राजकीय नेत्यांचा निषेध करण्यात आला आहे. हा निषेध करताना सत्ताधाऱ्यांनी बांधिलकी जनतेशी ठेवावी की, पैशाशी? असा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यासंदर्भात 'एनएसई'चे अध्यक्ष अल्तमश शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, वरिष्ठ पदाधिकारी हेमलता पाटील, शाहू खैरे, सुभाष देवरे, सिराज कोकणी, स्वप्निल पाटील, वसंत ठाकूर यांनी पुण्यातील हिट अँड रन केस प्रकरणी दोषींवर अत्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Nashik Congress
Porsche Crash Case: ससूनच्या डॉक्टरांशी टिंगरेंचा काय संबंध? अंबादास दानवे म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com