BJP Vs UBT News: महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील संघर्ष वेगळ्याच मार्गाला लागला आहे. या दोन्ही आघाड्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे निवडणुकीत आता चांगलीच रंगत भरली आहे.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सहकारी पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष एकत्र आले आहेत. त्याचा फटका अनेक विद्यमान नगरसेवकांना बसण्याची चिन्हे आहेत.
महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महाविकास आघाडीत मोठ्या भावाची भूमिका घेतली आहे. या पक्षातील अनेक नगरसेवक शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेले आहेत. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांच्या जागेवर नवे चेहरे निवडणुकीत आहेत.
मावळत्या महापालिकेतील २८ नगरसेवक परस्परांविरोधात उमेदवारी करीत आहेत. या नगरसेवकांनी निवडणुकीत जिंकण्याचा चंगच बांधला आहे. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर होताना दिसतो.
भाजपच्या विद्यमान २५ नगरसेवकांसह उद्धव ठाकरे शिवसेना आणि अन्य नगरसेवक 28 प्रभागांमध्ये एकमेकांच्या विरोधात उमेदवारी करीत आहेत. या स्थितीत मतदारांनाही दोन पैकी एका मतदाराला पसंती द्यावी लागणार आहे. परिणामी यंदाच्या निवडणुकीत किमान 28 नगरसेवक घरी बसणार हे निश्चित झाले आहे.
भाजपच्या माजी महापौर रंजना भानसी, मनसेचे माजी महापौर अशोक मुथडक, शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उपनेते अजय बोरस्ते, राहुल दिवे, माजी महापौर नयना घोलप, मनसेचे सुदाम ढेमसे आदी प्रमुख नगरसेवकांची लढत चर्चेत आहे. या नगरसेवकांच्या विरोधात प्रतिस्पर्धी नगरसेवक उमेदवारी करीत आहेत. या २८ ठिकाणी प्रतिष्ठित नगरसेवक लढा देत असल्याने हे प्रभाग चर्चेत आले आहेत.
महाविकास आघाडी पक्षात शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र आले आहेत. तर भाजपने स्वबळाची घोषणा केली. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही कडील नगरसेवकांमध्ये परस्परांविरोधात उमेदवारी करणे अपरिहार्य राजकारण ठरले. त्यात २८ नगरसेवकांना आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावावी लागली. नाशिककर यातील कोणते २८ नगरसेवकांच्या बाजूने कौल देतात, ही उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.