NMC building |Nashik NMC election News
NMC building |Nashik NMC election NewsSarkarnama

Nashik NMC Election : विवाहाची माहिती लपविल्याचा नगरसेविकेवर आरोप, पद रद्द करण्याची पराभूत कॉंग्रेस उमेदवाराची मागणी

Nashik corporator controversy : विवाहाची माहिती दडविल्याचा नगरसेविकेवर आरोप करण्यात आला आहे. पराभूत कॉंग्रेस उमेदवाराने याप्रकरणी पत्रकापरिषद घेऊन आरोप केले तसेच न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती दिली.
Published on

Nashik Politics : नगरसेविका जागृती गांगुर्डे यांनी महापालिका निवडणूक नामनिर्देशन अर्ज दाखल करताना विवाहाची माहिती दडवली आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी, महापालिका आयुक्त तसेच समाज कल्याण विभाग यांच्यासह मतदारांची दिशाभूल करत फसवणूक केली आहे. त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे. अशी मागणी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे पराभूत उमेदवार दिगंबर नाडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

प्रभाग १४ अ मधून अनुसूचित जाती जमाती वर्गातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जागृती गांगुर्डे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार दिगंबर नाडे यांनी उमेदवारी केली होती. सुमारे १२०० मताच्या फरकाने जागृती गांगुर्डे यांचा विजय झाला होता. परंतु, उमेदवारी करताना त्यांनी नामनिर्देशन पत्रात त्यांच्या पतीचा उल्लेख, त्यांच्या उत्पन्नाचा तसेच अपत्यांचा उल्लेख केला नाही. विशेष समाजाच्या व्यक्तीबरोबर त्यांचा विवाह झाला असताना ते देखील लपवण्यात आले. असा कुठल्याही विवाह झाला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यांनी विवाह केल्याचे विवाह नोंदणीपत्र देखील उपलब्ध आहे. त्यावर दोघांचे छायाचित्र आणि सही देखील आहे असे असताना त्यांनी विवाह झाले नसल्याचे सांगितले आहे.

अशाप्रकारे गांगुर्डे यांनी ५१ हजार मतदार, निवडणूक आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी, महापालिका आयुक्त, समाज कल्याण विभागाची दिशाभूल करत फसवणूक केली. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे. दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त मते प्राप्त उमेदवारास विजय घोषित करण्यात यावे. अशी मागणी दिगंबर नाडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

NMC building |Nashik NMC election News
Badlapur Egg Trafficking Case : स्त्रीबीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, महत्वाचा दुवा पोलिसांच्या हाती..जळगावातून ठोकल्या बेड्या

मनपातील प्रभांग क्रमांक १४ अ मधून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित जागेवर निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका जागृती गांगुर्डे मुस्लीम युवकाशी इस्लामी पद्धतीने विवाह केल्याची माहिती निवडणूक अर्जात लपवून समाज, शासन आणि निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे पराभूत उमेदवार दिगंबर नाडे यांनी पत्रकारपरिषदेत केली.

NMC building |Nashik NMC election News
Nashik Police Recruitment : टोमण्यांवर मात करत खाकीकडे झेप, नाशिकमध्ये पोलिस भरतीच्या मैदानात तृतीयपंथीयाची दमदार कामगिरी

याबाबत दिगंबर नाडे यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. १२ फेब्रुवारी रोजी निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे. लवकरच याबाबत सुनावणी होणार असल्याचेही नाडे यांच्या वकिलांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com