Suhas Kande Politics : मनमाडचा किंग झोपवला, सुहास कांदेंनी केला नव्या 'पाटलाचा' उदय

Manmad municipal election : आमदार सुहास कांदे यांचा कार्यकर्ता शिवसेनेचा उमेदवार योगेश पाटील हे मनमाडला नगराध्यक्षपदी निवडून आले. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवीण नाईक यांचा त्यांनी पराभव केला.

Suhas Kande, Yogesh Patil, Ganesh Dhatrak
Suhas Kande, Yogesh Patil, Ganesh DhatrakSarkarnama
Published on
Updated on

Nashik Poltics : मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले. नांदगावप्रमाणेच मनमाडमध्येही त्यांनी आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणला. तसेच नगरसेवकपदाच्या २१ जागा देखील निवडून आणल्या.

सुहास कांदे यांनी नगरपालिकेवर एकहाती सत्ता काबीज केली असून थेट नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार योगेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रवीण नाईक यांचा चुरशीच्या लढतीत पराभव करत विजय मिळवला. शिवसेनेचे योगेश पाटील हे आता मनमाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष झाले आहेत.

मनमाड नगरपालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी आमदार कांदे यांनी सुरुवातीपासून जबरदस्त चाल खेळली. सुरुवातीला मंत्री गिरीश महाजन यांना मॅनेज करुन भाजपसोबत युती केली. भाजपला केवळ तीन जागा देत नगराध्यक्षपदासह अन्य सर्व ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे केले.


Suhas Kande, Yogesh Patil, Ganesh Dhatrak
Suhas Kande Politics: नांदगावला सुहास कांदे यांचाच डंका; समीर भुजबळ यांना धक्का, सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी!

सुहास कांदेंनी काय जादू केली कुणास ठावूक पण मनमाडचा किंग म्हणून ओळख असलेल्या गणेश धात्रक यांच्यासारखा उमेदवार आपल्याकडे असतानाही भाजपने आख्खी नगरपालिकाच सुहास कांदेंना दान केली. गणेश धात्रक हे भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असतानाही भाजपने त्यांना एबी फॉर्म दिला नाही. त्यानंतर अपक्ष भरलेला फॉर्मही गणेश धात्रक यांनी मागे घेत सुहास कांदे यांच्यापुढे नांगी टाकली. तिथेच आर्धी लढाई कांदेंनी जिंकली होती.

त्यानंतर उमेदवारी न मिळालेले गणेश धात्रक यांचे अनेक समर्थक समीर भुजबळांकडे गेले. पण प्रत्यक्ष निवडणुकीत समीर भुजबळांचे अर्थात राष्ट्रवादीचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार रवींद्र घोडेस्वार हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. आमदार कांदे यांच्या उमेदवाराला कडवी झुंज दिली ती शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रवीण नाईक यांनी.


Suhas Kande, Yogesh Patil, Ganesh Dhatrak
Suhas Kande : मनमाडचा किंग राजकारणातून आउट, सुहास कादेंनी केला करेक्ट कार्यक्रम

राजकीय जाणकार सांगतात, प्रवीण नाईक यांना गणेश धात्रक यांची उघड मदत झाली असती तर कदाचित ते निवडूनही आले असते. पण धात्रक यांची आमदार कांदे यांनी फार आधीच कोंडी केल्याने मनमाडचा हा किंग घराच्या बाहेरच पडू शकला नाही. त्यामुळे प्रवीण नाईक यांचा पराभव झाला. सुहास कांदे यांनी आता मनमाडचा किंग असलेल्या गणेश धात्रकांना राजकारणातूनच आउट केलं आहे. त्याऐवजी आता योगेश पाटील यांच्या रुपाने नव्या पाटलाचा उदय केला आहे असं म्हणता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com