Nashik Politics : अब तेरा क्या होगा कालिया? नाशिकच्या तीन्ही भाजप आमदारांना हे वाक्य आठवलं तर नसेल?

Girish Mahajan strategy : मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी रणनिती आखली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी-आमदारांचा विरोध झुगारुन त्यांनी काही निर्णय घेतले होते.
Girish-Mahajan-Seema-Hiray-Devyani-Pharande-Rahul-Dhikle
Girish-Mahajan-Seema-Hiray-Devyani-Pharande-Rahul-DhikleSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शंभर प्लसचा नारा दिला होता. त्यासाठी स्थानिक आमदारांचा विरोध झुगारुन त्यांनी विरोधी पक्षातील अनेक मात्तबरांना भाजपमध्ये प्रवेश दिले. विधानसभेला बंडखोरी केलेल्या काही जणांची पुन्हा घरवापसी करुन घेतली. अगदी निवडणुकीच्या तोंडावरही स्थानिक आमदारांचा विरोध डावलून काही जणांना महाजनांनी प्रवेश दिले. त्यानंतर या आयारामांच्या कुटुंबात उमेदवारीही दिली. पण निष्ठावंतांना डावलून विरोधी पक्षातून आलेल्यांना तसेच पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक आमदारांनी प्रत्यक्षपणे महाजनांच्या निर्णयाला विरोध दर्शवला.

अगदी आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या साधू-महतांच्या राहण्याची सोय करण्यासाठी तपोवनाची जागा मोकळी करावी लागणार आहे. त्याठिकाणी साधूग्राम उभारण्यासाठी तपोवनातील १८०० झाडे तोडली जाणार या कथित मुद्द्यावर पर्यावरणप्रेमींनी आंदोलन सुरु केलं. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात हे आंदोलन होतं. अगदी गिरीश महाजन यांना लाकुडतोड्या म्हटलं गेलं. या आंदोलनात गिरीश महाजन पूर्णपणे एकटे पडले होते. त्यावर शहरातील एकाही आमदाराने महाजन यांची उघडपणे साथ दिली नाही.

निवडणूक प्रभारी या नात्याने नाशिकमधील महापालिका निवडणुकीचे निर्णय देखील महाजन हेच घेत होते. त्यादृष्टीने त्यांनी शंभर प्लसचा नारा दिला. स्थानिक आमदारांना डावलून पक्षात मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातील नेत्यांचे इनकमिंग घडवून आणले. गणेश गिते यांच्या प्रवेशाला नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांचा विरोध होता पण महाजन यांनी गिते यांना तरीही पक्षात घेतलं. निवडणुकीत त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी कट्टर विरोधक सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला होता. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी धाव घेतली. परंतु महाजन यांनी सीमा हिरे यांचा विरोध झुगारुन बडगुजर यांना पक्षात प्रवेश दिला. बडगुजर यांच्यासह त्यांचा मुलगा दीपक याला उमेदवारी दिली.

Girish-Mahajan-Seema-Hiray-Devyani-Pharande-Rahul-Dhikle
Nashik NMC Election : जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंना भाजपने बालेकिल्ल्यातच चारली धूळ, सुनेचाही पराभव

त्यानंतर उरल्या होत्या मध्य विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे त्यांचाही अगदी निवडणुकीच्या तोंडावर महाजन यांनी काटा मोडला. प्रभाग १३ मध्ये गिरीश महाजन यांनी आमदार फरांदे यांचा विरोध डावलून तीन्ही उमेदवार आयात केले. विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरेंच्या भाजप प्रवेशावरुन देवयानी फरांदे यांनी मोठं रान उठवलं. अगदी त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले. मात्र महाजन यांनी त्यांना विश्वासात न घेता या तिघांना पक्षातही घेतलं आणि तिघांच्या कुटुंबात उमेदवारीही निश्चित केली.

आयारामांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने निष्ठावंतामध्ये संतापाची लाट उसळली आहे असे वातावरण तयार झालं. भाजपच्या निष्ठावंतांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला मोठा विरोध केला. देवयानी फरांदे यांनीही प्रभाग १३ मध्ये झालेल्या प्रवेशाला स्पष्ट विरोध दर्शवला. भाजपच्या शहराध्यक्षांना निष्ठावंतांनी गाजर दाखवले. गिरीश महाजनांबाबत जळगावचं पार्सल जळगावला परत पाठवा असं बोललं जाऊ लागलं. एबी फॉर्म वाटपाच्या वेळी भाजपमध्ये मोठा गोंधळ उडाला. एबी फॉर्मची पळवापळवी झाली. या सगळ्यात भाजपला मोठा फटका बसेल त्याचा फायदा शिवसेनेला होईल असे बोलले जाऊ लागले.

Girish-Mahajan-Seema-Hiray-Devyani-Pharande-Rahul-Dhikle
Nashik MNS : एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये मनसेचे इंजिन फक्त एका जागेवर पडले बंद

परंतु प्रत्यक्षात महाजन यांनी स्थानिक आमदारांना डावलून केलेले बेरजेचे हे राजकारण अचूक निघाले. महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजपने बाजी मारली. मागील निवडणुकीच्या तुलनेत सहा जागा अधिक घेऊन महाजन यांनी नाशिकमध्ये एकहाती सत्ता आणून दाखवली. तब्बल ७२ जागा एकट्या भाजपने जिंकल्या. आता नाशिकमध्ये भाजपला कुणाच्या कुबड्यांची गरज उरलेली नाही. महाजन यांनी आपण खरोखर संकटमोचक असल्याचं सिद्ध केलं आहे.

Girish-Mahajan-Seema-Hiray-Devyani-Pharande-Rahul-Dhikle
Nashik MNS : एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये मनसेचे इंजिन फक्त एका जागेवर पडले बंद

भाजपला ७२ जागा मिळाल्या आहेत. आता नाशिकमध्ये शंभर टक्के भाजपचा महापौर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सगळेच आनंद साजरा करत आहेत. पंरतु प्रत्यक्षात जेव्हा निवडणूक प्रक्रिया चालू होती. त्यावेळी महाजनांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदारांचे आता काय होणार? शोले चित्रपटात ज्या प्रकारे गब्बर पिस्तूल रोखून आपल्या साथीदारांना विचारतो अब तेरा क्या होगा कालिया? हा डायलॉग महाजनांची कोंडी करु पाहणाऱ्या स्थानिक आमदार-लोकप्रतिनिधींना आता आठवत तर नसेल? आता आपलं काय होणार या विचाराने त्यांना हा डायलॉग सतावत तर नसेल? शिवाय महाजनांनी तिघाही आमदारांच्या मतदारसंघात तिघांना आधीच प्रतिस्पर्धी आणून ठेवले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com