Eknath Shinde Politics: एकनाथ शिंदे भाजपलाही नडले; कुंभमेळा नगरीतच ठरले नंबर वन, महाविकास आघाडीचा सुपडा साफ!

Nashik Muncipality Elections: BJP's retreat in Eknath Shinde's lead, Mahavikas Aghadi fails-एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सटाणा आणि त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपला अनपेक्षीत धूळ चारल्याने महायुतीच महायुतीशी लढल्याचे चित्र
Eknath-shinde-Ajit-Pawar-devendra-Fadanvis
Eknath-shinde-Ajit-Pawar-devendra-FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News: नगरपालिका निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. नाशिक जिल्ह्यात सटाणा आणि कुंभ नगरी त्र्यंबकेश्वर येथे अनपेक्षित निकाल आला. भाजपला हा मोठा धक्का मानला जातो.

महायुतीच्या नेत्यांनी नगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेचा विषय केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक नगरपालिका पिंजून काढली. सत्तेच्या माध्यमातून लाडकी बहीण ते लाडके मतदार इथपर्यंत प्रचार झाला.

आज जाहीर झालेल्या निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील सर्व ११ नगरपालिकांमध्ये महायुतीने झेंडा फडकवला. महायुतीतील घटक पक्षांतच लढत पाहायला मिळाली. त्यात एकनाथ शिंदे यांना लक्षणीय यश मिळाले.

Eknath-shinde-Ajit-Pawar-devendra-Fadanvis
Kopargaon Nagar Parishad Election Result : दोन उपमुख्यमंत्री, आमदार अन् अदृश्य शक्तीला थोपवलं; विवेक कोल्हेंनी देवाभाऊची विजय रॅली केली फिक्स!

विशेष म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने ही निवडणूक चुरशीने लढली. आमदार सुहास कांदे यांनी जवळपास सर्वच्या सर्व जागा जिंकून रेकॉर्ड केले. जिल्ह्यातील अन्य आमदारांना त्या तुलनेने अपेक्षित यश मिळाले नाही.

Eknath-shinde-Ajit-Pawar-devendra-Fadanvis
Yeola Election Result : भुजबळांनी हॉस्पिटलमधून गड राखला, राजेंद्र लोणारींचा दणदणीत विजय.. दराडे बंधूंना चारली धूळ..

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने भाजपला अनपेक्षित धक्का दिला. कुंभनगरी त्र्यंबकेश्वर येथे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय कैलास घुले यांना शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार यांनी पराभूत केले. सटाणा येथे भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांना सर्वाधिक जागा मिळूनही नगराध्यक्ष पद मात्र शिवसेनेच्या हर्षदा पाटील यांनी पटकावले. एकंदरच शिवसेना शिंदे पक्ष भाजपलाही नडला.

जिल्ह्यातील ११ नगरपालिकांपैकी सर्वाधिक पाच नगराध्यक्ष आणि ८८ नगरसेवक शिवसेना शिंदे पक्षाने निवडून आणले. भारतीय जनता पक्षाला तीन नगराध्यक्ष आणि ६७ नगरसेवक मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने तीन नगराध्यक्ष निवडून आणले. पक्षाचे ६३ नगरसेवक निवडून आले. शिवसेना ठाकरे पक्ष २७ हे पक्ष वगळता अन्य पक्षांना फारसे लक्षणीय यश मिळाले नाही.

शिवसेना शिंदे पक्षाचे शालिनी खातळे (इगतपुरी), हर्षदा पाटील (सटाणा), योगेश पाटील (मनमाड), त्रिवेणी तुंगार (त्रंबकेश्वर) आणि सागर हिरे (नांदगाव) थेट नगराध्यक्ष झाले. भाजपचे डॉ मनोज बर्डे (पिंपळगाव बसवंत), वैभव बागुल (चांदवड) आणि अनिता घेगडमन (ओझर) हे तीन नगराध्यक्ष निवडून आले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विठ्ठल राजे उगले (सिन्नर), प्रेरणा बलकवडे (भगूर) आणि राजेंद्र लोणारी (येवला) हे नगराध्यक्ष झाले. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सिन्नर येथे नगराध्यक्ष मिळाले मात्र नगरसेवकांची संख्या घटली. छगन भुजबळ यांनी आपला येवला हा बालेकिल्ला सुरक्षित ठेवला.

जिल्ह्यात अकरा नगरपालिकांच्या २६६ जागा होत्या. मनमाड येथील दोन जागांवरील निवडणुका स्थगित झाल्या. त्यामुळे २६४ जागांवर निवडणूक झाली. यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सर्वाधिक ९८ जागा मिळाल्या. भाजप ६७, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ६२, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला ३३, शिवसेना शरद पवार पक्षाला तीन आणि ११ अपक्ष निवडून आले आहेत. यातील दोन पक्षांनी शिवसेना शिंदे पक्ष तर एकाने भाजपचे स्वीकृत सदस्यत्व स्वीकारले आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com