Narendra Modi: मोदींच्या काटकसरीच्या मंत्राला हिमगौरी आडके यांची साथ; ऑनलाइन महासभा अन् इलेक्ट्रिक वाहनांचा निर्णय!

Narendra Modi online mega meeting decision: पंतप्रधानांच्या काटकसरीला महापौर हिमगौरी अडके यांचा धडाकेबाज प्रतिसाद...
Himgauri Aadke backs Modi green initiative
Himgauri Aadke backs Modi green initiativeSarkarnama
Published on
Updated on

Himgauri Adke Supports PM Modi Green Initative : देशातील आर्थिक अडचणी आणि समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केले होते. त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. भाजपने त्याचे जोरदार समर्थन केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन वाचाविण्याचे आवाहन केले होते. त्याला राज्य सरकार आणि विविध संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत. 

नाशिक महापालिकेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. महापौर हिमगौरी आडके आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र बच्छाव यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. पालिकेत धडाकेबाज निर्णय घेण्यावर त्यांनी भर दिला. 

Himgauri Aadke backs Modi green initiative
BJP News : महाराष्ट्रातील भाजप आमदारांनी PM मोदींचे आदेश धुडकावले : VIP ट्रिटमेंट अन् गाड्यांच्या ताफ्यांचा मोह सुटेना

महापालिकेच्या महासभा आणि स्थायी समितीच्या सभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय महापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींनी जाहीर केला आहे. ती बचतीवर भर देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. कामकाजाच्या कार्यपद्धतीत अनेक मोठे बदल अपेक्षित आहेत. 

Himgauri Aadke backs Modi green initiative
Minister's Convoy: सामान्यांना दिलासा मिळणार? महाराष्ट्रात मंत्र्यांच्या ताफ्यांवर निर्बंधांचे संकेत; मोदींच्या आवाहनाचा परिणाम

महापालिकेचे इंधन वाचविण्यासाठी सहाही विभागीय कार्यालयांमध्ये मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी यापुढे इलेक्ट्रिक वाहने खरेदी केले जाते. ज्या चार विशेष समित्या गठीत केल्या जातील त्यांच्यासाठी ई वाहने खरेदी केली जाणार आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला बळकटी मिळेल. 

महापौर हिमगौरी अडके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन सबंध देशासाठी आहे. एक नागरिकांनी निर्णया मागील कळकळ लक्षात घेतली पाहिजे. त्याचा संदर्भ विचारात घेऊनच आम्ही यापुढे ऑनलाईन बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले.

महापालिकेच्या या पुढील महासभा ऑनलाईन होणार आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होईल. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम याचाही विचार महापालिका करणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला महापौरांनी दिलेला धडाकेबाज प्रतिसाद चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com