BJP News : महाराष्ट्रातील भाजप आमदारांनी PM मोदींचे आदेश धुडकावले : VIP ट्रिटमेंट अन् गाड्यांच्या ताफ्यांचा मोह सुटेना

BJP News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतरही महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे मोठे वाहन ताफे चर्चेत आले आहेत.
Large vehicle convoys of BJP leaders in Maharashtra trigger debate over fuel conservation and VIP culture.
Large vehicle convoys of BJP leaders in Maharashtra trigger debate over fuel conservation and VIP culture.Sarkarnama
Published on
Updated on

BJP News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचे केलेले आवाहन चक्क भाजपचे महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारच धुडकावताना दिसत आहेत. VIP ट्रिटमेंट अन् गाड्यांचा ताफा घेऊन फिरण्याचा अनेक नेत्यांचा मोह अजूनही कायम आहे.

अमेरिका-इराण युध्दामुळे जागतिक पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झाल्याने भारतासह जगभरातील अनेक देशांना त्याचा फटका बसला आहे. इंधनाचा तुटवडा भासत आहे, सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. युध्दाचे ढग दूर न झाल्यास भारताला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ओढावलेल्या या संकटातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी देशवासियांना काटकसरीचे आवाहन केले आहे. पुढील किमान वर्षभर तरी परदेश प्रवास टाळावा, सोने खरेदी करू नये, इंधनाचा जपून वापर करावा, वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मिटिंग्ज या गोष्टींना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या विभागात काही निर्णय घेतले. पण अजूनही काही मंत्री आणि आमदार या आवाहनाकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. नागपूरच्या कोराडीत आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दौरा होता. इथल्या हनुमान मंदिराचा पाहणी दौरा ते करत होते. त्यांच्या या दौऱ्यासाठी 5 गाड्यांचा ताफा होता.

Large vehicle convoys of BJP leaders in Maharashtra trigger debate over fuel conservation and VIP culture.
BJP News : मुंबईत महापालिकेच्या शौचालयांवर भाजपचा डल्ला : आमदार निधीतून बांधलं पक्ष साहित्यासाठी गोडावून अन् सुसज्ज हॉल

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम नालेसफाई पाहणी दौऱ्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत तब्बल एकूण 25 गाड्यांचा ताफा दिसून आला. साटम यांच्या स्वतःसाठीच्या 2 गाड्या, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या गाड्या अशा एकूण 25 गाड्यांचा ताफा संपूर्ण मुंबई उपनगरात फिरत होता. N

Large vehicle convoys of BJP leaders in Maharashtra trigger debate over fuel conservation and VIP culture.
BJP News : भाजपमध्ये आणखी एक 'विनोद तावडे' तयार होतायत? मंत्रिमंडळातून डावलेल्या नेत्याला अमित शाहंनी केलं जवळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी यांना परदेशी फिरण्याचे, इंधन बचतीचे कोणते निर्बंध नाहीत. मंत्री, आमदार त्यांचा त्यांचा ताफा घेऊन फिरणार, मग सर्वसामान्यांनाच हे आवाहन का? असा सवाल सर्वसामान्य लोक विचारत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com