Maratha Reservation : मराठा आंदोलनाबाबत मोठी बातमी! लाखो कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप : आंदोलकांवरील गुन्हे मागे, वारसांना नोकरी अन् 10 लाखांची आर्थिक मदत...

Maratha Reservation Update | 12 Lakh Kunbi Certificates Issued : शिंदे समितीने कामकाज सुरू केल्यापासून राज्यात 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या नोंदींच्या आधारे आतापर्यंत एकूण 12 लाख 11 हजार 303 कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजातील मोठ्या संख्येने नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळल्याचं पाहायला मिळत आहे.
Manoj Jarange Patil | Maratha Reservation
Maratha reservation activist Manoj Jarange Patil addressing supporters during the Maratha reservation movement demanding Kunbi certificates for the community.Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभारले आहे. त्यांच्या या लढ्याला आता काही प्रमाणात यश मिळताना दिसत आहे.

शिंदे समितीने कामकाज सुरू केल्यापासून राज्यात 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या नोंदींच्या आधारे आतापर्यंत एकूण 12 लाख 11 हजार 303 कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजातील मोठ्या संख्येने नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळल्याचं पाहायला मिळत आहे.

गुरुवारी (ता.5) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मराठा समाजाशी संबंधित विविध मुद्द्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी राज्यात सापडलेल्या 48 लाख कुणबी नोंदींच्या आधारे 12 लाख 11 हजार 303 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

या प्रमाणपत्रांपैकी छत्रपती संभाजीनगर विभागात 2 लाख 57 हजार 84 तर बीड जिल्ह्यात 34,692 कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत सातारा गॅझेटियर लागू करण्याबाबत मंत्रिमंडळ समितीने पुणे विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

Manoj Jarange Patil | Maratha Reservation
Governor Appointments India : राष्ट्रपतींकडून देशभरात मोठे फेरबदल! महाराष्ट्र, बिहार अन् पश्चिम बंगालसह 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती जाहीर

तसेच मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या 161 गुन्ह्यांपैकी 71 गुन्हे मागे घेणे प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली. मुंबईतील 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या 306 व्यक्तींपैकी 275 जणांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.

Manoj Jarange Patil | Maratha Reservation
Pune BJP : केंद्र सरकारच्या पुण्यातील 'त्या' प्रकल्पाला भाजप नगरसेवकांचा अडथळा, अंतर्गत राजकारणामुळे कोट्यवधींचा निधी परत जाण्याचा धोका

तर मृतांच्या 21 वारसांना राज्य परिवहन महामंडळात अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती यांनीही वारसांना नोकरी देण्याबाबत संचालक मंडळात ठराव करण्याचे निर्देश उपसमितीने दिले आहेत.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती मिळत नाही, त्या अभ्यासक्रमांनाही शिष्यवृत्ती लागू करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागाने सादर करावा, असे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीने दिले आहेत. त्यामुळे एकूणच, मराठा समाजासाठी या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com