Ajit Pawar News : अजित पवार यांना हवा असलेला रजनीकांत कोण?

NCP Crisis : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका…
Ajit Pawar, Rajnikanth
Ajit Pawar, RajnikanthSarkarnama

Ajit Pawar On Sharad Pawar : रोखठोक बोलणाऱ्या नेत्यांपैकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जातं. पण अनेकदा याच बोलण्यामुळे ते अडचणीतही आले आहेत. आता त्यांनी कार्यकर्ता कसा असावा, याबाबत उदाहरण देताना थेट सुपरस्टार रजनीकांत यांचं नाव घेतलं. रजनीकांत यांची सुरूवात ते सुपरस्टार पर्यंतचा प्रवास सांगताना त्यांनी आपणही असेच कार्यकर्ते शोधत असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सध्या दोन गट पडले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाचे नेत्यांकडून आता राज्यभर आपली भूमिका मांडण्यासाठी दौरे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अजितदादांकडून (Ajit Pawar) नाव न घेता सातत्याने टीका केली जाते. भाजपसोबत गेल्याच्या मुद्द्यावर त्यांनी राज्याच्या विकासासाठी विचार करून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

Ajit Pawar, Rajnikanth
Ambadas Danve News : दानवेंच्या मुलाच्या लग्नाला वऱ्हाडी कोण-कोण? शिंदे-फडणवीसांनाही निमंत्रण...

उपमुख्यमंत्री पवार काल नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मी काही लेचापेचा नाही. जे काही असेल ते मी स्पष्ट बोलत असतो. तोंडावर एक आणि पाठ फिरल्यावर एक असे करीत नाही. सगळेच मला ओळखतात. ज्यांचे वय ८०-८५ वर्ष झाले त्यांनी आशीर्वाद देण्याचे काम करावे, याचा पुनरुच्चार केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कालच सावित्रीबाई फुले यांची जयंती होती. त्याकाळीदेखील त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कसे शिकवले, कसे घडवले हा आदर्श आजही आहे. आम्ही जरी राजकीय क्षेत्रात काम करीत असलो, तरीही वेगवेगळ्या क्षेत्रात संबंध ठेवणे आणि त्या प्रश्नांना मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. समाजात वावरताना वेगवेगळ्या बातम्या कानी येतात. त्यातील चांगल्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे. नाउमेद कधीही व्हायचं नाही, असा संदेश मी प्रत्येक गोष्टीतून घेत असतो.

उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सुपरस्टार रजनीकांत यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, रजनीकांत म्हणजे शिवाजीराव गायकवाड. त्यांना कोल्हापूर येथे कोणी बघितलं आणि त्यांना चित्रपटात घेतलं. त्यात ते यशस्वी झाले. रजनीकांत आपल्या कामाच्या जोरावर यशस्वी झाले. आज ते सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत. तशाच प्रकारे चांगला कार्यकर्ता शोधण्याचं काम आम्ही करीत असतो.

(Edited By - Rajanand More)

Ajit Pawar, Rajnikanth
Jitendra Awhad: श्रीरामाबाबत वादग्रस्त विधान; आव्हाडांचा सेल्फ गोल...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com