Dada Bhuse : मंत्री भुसे म्हणतात, जरांगे पाटलांच्या भावना योग्यच!

Dada Bhuse on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या भावनांशी आपण सहमत आहोत. त्यांच्या भावना योग्यच आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात विविध स्तरावर काम करीत असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.
Dada Bhuse on Manoj Jarange Patil
Dada Bhuse on Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Dada Bhuse on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील पाचव्यांदा उपोषणास बसले आहेत. अंतरवाली सराटी येथे त्यांचे उपोषण सुरू झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरंगे पाटील यांचा मागील वर्षभरापासून संघर्ष सुरू आहे. या संदर्भात राज्य शासनाने त्यांच्या विविध मागण्यांवर कार्यवाही केली आहे. मात्र, त्यातून मराठा आरक्षणाच्या समर्थकांचे समाधान झालेले नाही.

या संदर्भात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भावनांशी आपण सहमत आहोत. त्यांच्या भावना योग्यच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात विविध स्तरावर काम करीत आहेत.

Dada Bhuse on Manoj Jarange Patil
Assembly Election 2024 : मोठी बातमी! भाजप 'एवढ्या' जागा लढण्याच्या तयारीत, शिंदे अन् अजितदादांचं काय?

कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. ती लवकरच पूर्ण केली जाईल. उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 13 टक्के आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आले आहे. आरक्षणासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने एक खिडकी योजना देखील सुरू केली. त्यामुळे अनेक समस्यांचे निराकरण होईल, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला.

Dada Bhuse on Manoj Jarange Patil
Dilip Patil News : मराठा आंदोलनाचा मोठा चेहरा हरपला! ; आरक्षण याचिकाकर्ते दिलीप पाटील यांचे निधन

जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. पुढील महिन्यात जरांगे पाटील हे राज्यातील विविध भागांचा दौरा करणार आहेत. यामध्ये नाशिकलाही त्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर या आंदोलनाशी संबंधित संघटना आणि कार्यकर्ते यांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन या संदर्भात सगे सोयरे या विषयावर काय निर्णय घेते, याची आता उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com