Dilip Patil News : मराठा आंदोलनाचा मोठा चेहरा हरपला! ; आरक्षण याचिकाकर्ते दिलीप पाटील यांचे निधन

Maratha Kranti Morcha leader Dilip Patil : मराठा आरक्षण संदर्भात न्यायालय लढाईत त्यांचा मोठा सहभाग होता ; दिलीप पाटील यांच्या निधनामुळे मराठा आरक्षण चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
Dilip Patil
Dilip PatilSarkarnama
Published on
Updated on

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते दिलीप पाटील यांचे आज(शनिवारी) निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची तब्येत घालवली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांना पुणे येथे नेले जात असतानाच कराड नजीक त्यांचे निधन झाले. मराठा आरक्षण संदर्भात न्यायालय लढाईत त्यांचा मोठा सहभाग होता.

कोल्हापुरातील मराठा आरक्षण(Maratha Reservation) संदर्भात न्यायालयीन लढा देणारे दिलीप पाटील यांचे आज निधन झाले. गेले काही दिवसांपासून मुंबई येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांना घरी पाठवण्यात आले होते. मात्र आज(शनिवारी) पहाटेच्या सुमारास त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने कोल्हापुरातील स्वस्तिक हॉस्पिटल येथे दाखल केले होते.

Dilip Patil
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचा लाडकी बहीण योजनेवर सरकारला टोला, म्हणाले, 'लाडकी मेव्हणी...'

परंतु तब्येत आणखी खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आणि त्यानंतर पुणे येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच कराड येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठा समाजातील मराठा आरक्षण चळवळीचे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

मनोज जरांगे पुन्हा उपोषणास बसणार -

'तब्येत साथ देत नाही, पण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण करणार. सरकारने धोका दिला आता कारण नको आरक्षण द्या. वेळ वाढवून दिला तरीही सगे सोयरे कायद्याची अमलबजावणी केली नाही. म्हणून पाचव्यांदा उपोषण करावे लागत आहे. आता मागे हटणार नाही. कठोर उपोषण करणार, वैद्यकीय उपचार, पाणी घेणार नाही.' असे स्पष्ट करत मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

Dilip Patil
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंकडून उपोषणाच्या काही तास आधीच शिंदे सरकारचं कौतुक; म्हणाले...

तसेच '29 ऑगस्टला आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे, त्याच दिवशी मोठा निर्णय घेऊ, असे सांगत जरांगे पाटील यांनी त्याच दिवशी राज्यभरातील मराठा बांधवाची बैठक घेणार असल्याचे जाहीर केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com