BMC Voting : 'व्होटी चोरी', दुबार मतदारांना रोखण्यासाठी ठाकरे बंधूंचा 'भगवा गार्ड', मतदार केंद्राबाहेर काय रणनीती?

Bhagwa Guard Raj Thackeray Uddhav Thackeray : मुंबई महापालिका निवडणुकीत मतदान सुरू झाले आहे. मात्र, दुबार मतदान रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी रणनीती आखली आहे. त्यांची पथके मतदान केंद्राबाहेर पोहोचली आहेत.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

BMC Bhagwa Guard News : विधानसभा निवडणुकीत व्होट चोरीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मुंबई महापालिकेत देखील दुबार मतदानाच्या माध्यमातून 'व्होटी चोरी'ची भीती ठाकरे बंधूंना सतावत होती. त्यामुळेच त्यांनी याचा बंदोबस्त करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर 'भगवा गार्ड' तैनात करण्यात केले आहे.

मतदानाला सुरुवात झाली असून हळूहळू मतदार बाहेर पडत आहेत. मात्र, मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदान केंद्रावर ठाकरेंच्या भगवा गार्डचे पथक तैनात होते. या पथकात आठ जणांचा समावेश आहे. त्यांना विशेष टी शर्ट दिले असून त्यावर मी मराठी भगवा गार्ड असा मजकूर आहे.

मुंबई महापालिकेत निवडणुकीच्या यादीत तब्बल 11 लाख दुबार नावं आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने ही नावं हटववी नसल्याने या नावांचा वापर करून दुबार मदतानाचा धोका असल्याने तो रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी भगवा गार्डची स्थापना केली. दुबार मतदारांना रोखणं हे या भगवा गार्डचे काम असणार आहे.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Mahapalika Nivadnuk 2025: मतदानाला काही तास शिल्लक असतानाच संभाजीनगरमध्ये राडा; आठ जण जखमी, व्हिडिओ पाहा

भाजपची टीका

आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंच्या भगवा गार्ड टीका करताना म्हटले की, हिंदू मतदारांना रोखण्यापेक्षा मोहल्ल्यात जावून, बेहराम पाड्यात जाऊन तेथील बोगल मतदारांचे पाय तोडा. आहे का तुमच्यात हिंमत?

कुठे दुबार मतदार?

मुंबईत एकूण एक कोटी तीन लाख 44 हजार 315 मतदार आहे. त्यात पश्चिम उपनगरात चार लाख 98 हजार 597 दुबार मतदार आहेत. पूर्व उपनगरात तीन लाख 29 हजार 216 दुबार मतदार आहेत. मुंबई शहरात दोन लाख 73 हजार 692 हजार दुबार मतदार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मुंबईतील दुबार मतदारांची आकडेवारी 11 लाखाच्या पार जाते.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Sambhaji Nagar Election: आता तर हद्दच झाली! एकाच महापालिकेत एकच उमेदवार दोन पक्षांकडून लढतोय निवडणूक; आयोगाचं काय सुरुए?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com