Nashik NMC News: रस्त्यावरील न बुजवलेले खड्डे आणि डांबरीकरण केलेल्या कंत्राटदारांवर जनतेच्या पैशांची कोट्यावधींची खैरात महासभेने थांबवली. महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपनेच हा निर्णय घेतला. यावेळी नगरसेवकांनी आयुक्तांच्या निर्णयाची अक्षरशा चिरफाड केली
शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करणाऱ्या कंत्राटदार्यांवर महापालिका प्रशासन अचानक मेहरबान झाले होते. त्यासाठी यापूर्वी केलेल्या रस्त्यांच्या कामांना स्टार रेट देण्याचा प्रस्ताव होता. आयुक्तांच्या या प्रस्तावात जनतेच्या सुमारे शंभर कोटी रुपयांची उधळपट्टी होणार होती.
शुक्रवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. विशेष म्हणजे भाजपचे स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी हाच प्रस्ताव दोन वेळा मंजूर केला होता. मात्र महासभेने तो फेटाळला. त्यामुळे कंत्राटदार आणि प्रशासनाचा हिरमोड झाला.
अमेरिका आणि इराक युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या दरात वाढ झाली. त्यामुळे डांबरांचे दर वाढले. त्यासाठी दरात फेरबदल म्हणून कंट्रकदाऱ्यांना जादा पैसे अदा करावेत असा महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव होता.
यासंदर्भात भाजपचे दिनकर पाटील, गटनेते श्याम बडोदे, गुरमीत बग्गा, सुधाकर बडगुजर, अजिंक्य साने यांसह विविध नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला. नियमानुसार महासभेने धोरणात्मक निर्णय घेतल्यावर तो स्थायी समितीवर जायला हवा. या प्रकरणात मात्र आधी प्रशासनाने प्रस्ताव तयार केला. त्यानंतर कंत्राटदारांनी दरवाढ मिळावी अशी मागणी असलेले पत्र दिले.
प्रशासकीय स्तरावरील काही अधिकाऱ्यांचा जनतेचा पैसा उधळण्याचा हा डाव महासभेने रोखला. त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नगरसेवकांत मात्र दोन गट पडले. गटनेते अजय बोरस्ते आणि समीर कांबळे यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. मात्र याच पक्षाचे किरण गामने आणि हर्षदा गायकर यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे शिवसेना शिंदे परिषद जनतेच्या पैशाची कंत्राटदारांमधील उधळपट्टी यावरून दोन गट पडल्याचे दिसले.
या निमित्ताने सत्ताधारी भाजप आणि महापालिका आयुक्त यांच्यात मतभेद समोर आले. महापालिकेतील 'स्टार रेट'देण्यावरून प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे बिंग फुटले. त्यामुळे आयुक्त मनीषा खत्री यांना हा प्रस्ताव मागे घ्यावा लागला.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.