Thane Politics : मसाल्यावरून शिवसेना-भाजपमध्ये 'भडका'; नगरसेवक आक्रमक; महापालिकेच्या कारवाईला विरोध

Shiv Sena Thane Municipal Corporation : अनेक पिढ्यांपासून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मसाला डंक व्यावसायिकांना न्याय मिळालाच पाहिजे. मुंबई महापालिकेने जसा निर्णय घेतला, तसाच निर्णय ठाण्यातही घ्यावा,अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली.
Thane Municipal Corporation
Thane Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

Thane News : ठाणे शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेल्या मसाला गिरण्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होत असल्याचा आरोप भाजपने करतकारवाईची मागणी केली. त्यानुसार महापालिका प्रशासनाने देखील कारवाईची बडगा उगारला. त्याचे पडसाद मंगळवारी पार पडलेल्या महासभेत उमटले.

सत्ताधारी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी उडाल्याचे पाहायला मिळाले. मसाला डंक सील करण्याच्या कारवाईवर भाजपने प्रशासनाला धारेवर धरले, तर सत्ताधाऱ्यांनीही हा मुद्दा आक्रमकपणे उचलत भाजपवरच पलटवार केला. त्यामुळे सभागृहात आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली.

ठाण्यातील महात्मा फुले मार्केट मधील असलेल्या अनधिकृत मसाला गिरण्यांमुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याचा व प्रदूषण होत असल्याचे कारण पुढे करीत, त्याबाबत कारवाईची मागणी भाजपने केली. त्यावर मंगळवारच्या महासभेत शिवसेना पक्षाचे गटनेते यांनी मसाला डंक व्यावसायिकांच्या बाजूने भूमिका घेत, प्रशासनाच्या कारवाईवर संताप व्यक्त केला. आपल्या जेवणात मसालाच नसेल तर चव काय राहणार? असा सवाल त्यांनी केला.

अनेक पिढ्यांपासून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मसाला डंक व्यावसायिकांना न्याय मिळालाच पाहिजे. मुंबई महापालिकेने जसा निर्णय घेतला, तसाच निर्णय ठाण्यातही घ्यावा,अशी मागणी त्यांनी केली. तर, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही प्रशासनाला सवाल करत, हे व्यापारी ६० ते ७० वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. मग आता अचानक त्यांना त्रास का दिला जात आहे? असा सवाल उपस्थित केला.

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गटनेते नगरसेवक नजीब मुल्ला यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करीत, वषार्नुवर्षे व्यापार करणाऱ्या लोकांवर कारवाई करून दुकाने बंद करणे चुकीचे आहे. प्रदूषणाचा मुद्दा पुढे करून त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरीकरण वाढत असताना आक्षेप आला म्हणून थेट कारवाई करू नका. आधी पुनर्वसन करा, पर्याय द्या आणि मग निर्णय घ्या अशी भूमिका मांडली.

Thane Municipal Corporation
Maharashtra News Live Update : सीएनजीच्या दरात 1 रुपये आणि पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ

भाजपच्या नगरसेविका उषा वाघ यांनीही नव्याने उभारण्यात आलेल्या सात गाळ्यांवर आक्षेप घेत, पूवीर्ची दुकाने ठीक आहेत, पण नव्याने सात गाळे उभारले गेले आहेत. आपण दुसऱ्या गावदेवी मंडईसारखी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहोत का? असा टोला लगावला. मनोहर डुंबरे यांनी नागरिकांच्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करत, पूवीर्ची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या यात मोठा फरक आहे. नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. सुरेश कांबळे यांनी मसाला विक्रीवर कोणतीही बंदी नाही. मात्र अनधिकृत गॅसचा वापर हा मुख्य मुद्दा असल्याचे सांगितले.

दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेचे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी संतुलित भूमिका घेत, व्यापाऱ्यांना एका दिवसात हाकलून लावणे योग्य नाही. सरसकट निर्णय घेण्याऐवजी आधुनिक आणि सुरक्षित मंडई कशी उभी करता येईल यावर भर दिला पाहिजे, असे सांगितले.

प्रशासनाने सांगितले कारवाईचे कारण

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यात ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर संबंधित व्यावसायिकांनी प्रदूषण कमी करण्याचे हमीपत्र दिले होते. मात्र पुन्हा ध्वनी प्रदूषण वाढल्याने कारवाई करून आस्थापना सील करण्यात आल्या. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी अपेक्षित परिणाम दिसून आले नाहीत. तसेच संबंधित ठिकाणी फक्त विक्रीची परवानगी असून प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने पुढील कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Thane Municipal Corporation
Mumbai Manhole Accident : महापौरांच्या डोळ्यांदेखत BMC कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला, थरारक व्हिडिओ व्हायरल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com