Eknath Shinde Politics: भाजपची ‘ती’ रणनीती यशस्वी? त्याच मैदानावर सभा घेत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल!

Nashik NMC Election Eknath Shinde Shiv Sena Uddhav Thackeray Prediction BJP Strategy Implemented-नाशिक महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी भाजपला सेफ ठेवत उद्धव ठाकरेंवर केला टिकेचा भडीमार
Eknath-Shinde-On-Uddhav-Thackeray
Eknath-Shinde-On-Uddhav-ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shinde- Thackeray News: महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेची संयुक्त सभा दोन दिवसांपूर्वी झाली. या सभेला भाजपसह शिवसेना एकनाथ शिंदे यांनी उत्तर देण्याची जोरदार व्युहरचना केली आहे.

गोल्फ क्लब मैदानावर दोन दिवसांपूर्वी उद्धव आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा झाली. त्याच मैदानावर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. शिंदे यांच्या सभेत भाजपला सेफ करीत उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा वेगळ्याच दृष्टीने चर्चेचा विषय ठरली आहे. यामध्ये भाजपची राजकीय व्युहरचना यशस्वी झाली, अशी कुजबुज होत आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केलेला अंदाज आणि भाजपची रणनिती प्रत्यक्षात आल्याचे यातून जाणवले.

Eknath-Shinde-On-Uddhav-Thackeray
Sameer Bhujbal Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीने केली भाजपची कोंडी; शहराच्या विकासात अपयशी ठरल्याचा आरोप

भारतीय जनता पक्षाने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला नामोहरम करण्यासाठी वेगळीच व्युहरचना केली आहे. यामध्ये पूर्वाश्रमीच्या शिवसेना नेत्यांना परस्परांविरुद्ध झुंज विले जात आहे. नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रोज परस्परांचे वस्त्रहरण करत आहेत.

Eknath-Shinde-On-Uddhav-Thackeray
NCP Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणतात, भाजपचा ‘हंड्रेड प्लस’ नारा पोकळ ठरणार!

दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापालिका निवडणुकांच्या प्रचारात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आपले विरोधक मानते. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीत. त्यामध्ये राजकीय दृष्ट्या भाजपचेच काम सोपे केले जात आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि त्याचे नेते यांना त्यांच्याच पूर्वाश्रमीचे नेत्यांकडून झुंजविले जाते. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची बहुतांशी राजकीय शक्ती त्यांना उत्तर देण्यात खर्च होत आहे. भारतीय जनता पक्ष मात्र या भांडणात आपली निवडणुका जिंकण्याची रणनीती यशस्वी करताना दिसतो.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा डाव यापूर्वीच ओळखला असावा. नाशिकचे पदाधिकाऱ्यांना दोन महिन्यांपूर्वी त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली होती, असे कळते. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष मात्र सावध झाला आहे. त्यांनी आपले टार्गेट शिंदे यांच्या ऐवजी भाजप हेच कायम ठेवले आहे.

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. प्रारंभी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला चर्चेत गुंतविण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र जागा वाटपात एकमत होण्याची शक्यता नसल्याने भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहे.

यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि अजित पवार हे स्वतंत्र लढल्याने विरोधकांचा स्पेस या दोन्ही पक्षांकडे जाण्याची शक्यता आहे. त्यात अंतिमतः सत्तेत सहभागी असल्याने हे दोन्ही पक्षांचे बळ भाजपलाच मदतीला येणार आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गोल क्लब मैदानावर शनिवारी सहभाग घेतली. त्याच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांची त्याच ठिकाणी सभा झाली होती. विशेष म्हणजे शिंदे यांच्या सभेत सर्वच नेत्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला टार्गेट केले होते. त्यामुळे ही सभा राजकीय व्यवहरचना म्हणून विशेष चर्चेत आहे.

-----

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गोल क्लब मैदानावर शनिवारी सहभाग घेतली. त्याच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांची त्याच ठिकाणी सभा झाली होती. विशेष म्हणजे शिंदे यांच्या सभेत सर्वच नेत्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला टार्गेट केले होते. त्यामुळे ही सभा राजकीय व्यवहरचना म्हणून विशेष चर्चेत आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com