RPI Prakash Londhe News: खंडणी आणि संघटित गुन्हेगारी प्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे सध्या जेलमध्ये आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले पक्षाचे ते पदाधिकारी आहेत. सध्या कारागृहातून निवडणुकीत उतरले आहेत. आरपीआय रामदास आठवले पक्षाचे प्रकाश लोंढे यांना काल दोन तासांसाठी कारागृहातून बाहेर सोडण्यात आले.
काकूंच्या अंत्यसंस्कारासाठी ही सवलत देण्यात आली होती. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. माजी नगरसेवक प्रकाश लोंढे सातपूर येथील हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी घेतल्याच्या आरोपाखाली अटक आहेत. त्यांच्यावर मोका अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यांची दोन्ही मुले देखील कारागृहात आहेत. श्री लोंढे यांनी कारागृहातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या माजी नगरसेविका दीक्षा लोंढे यादेखील उमेदवार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने अंत्यसंस्कारासाठी पॅरोल मिळालेल्या लोंढे यांनी त्या संधीचा लाभ घेतला.
अंत्यसंस्कार समयी मोठ्या संख्येने लोंढे यांचे समर्थक उपस्थित होते. यावेळी त्यांनी पोलिसांच्या गाडीला घेराव देखील केला होता. अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या लोंढे यांनी मात्र या संधीचा लाभ घेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. आमच्या कुटुंबावर आणीबाणीची परिस्थिती आहे. मात्र कोणीही रडायचं नाही.
कारण ही वेळ रडण्याची नाही तर लढण्याची आहे. मतदारांमध्ये जाऊन आपली भूमिका मांडण्याची आहे. असे सांगत लोंढे यांनी हात जोडले. यावेळी विविध गुन्हे दाखल असलेल्या लोंढे यांनी हात जोडत सगळ्यांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. सगळ्यांनी कायद्याचे पालन करावे.
कोणीही नियम आणि पोलिसांचे आदेश मोडू नये, असे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले. प्रकाश लोंढे यांना दोन तासांसाठी कारागृहातून सोडण्यात आले होते. मात्र त्यामुळे महापालिका निवडणुकीत शहरभर त्यांच्या उमेदवारीची चर्चा घडविण्यात ते यशस्वी झाले. या निमित्ताने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होईल का? अशी विचारणा होत होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.