Pune Police: गुंड गजा मारणे पोलिसांच्या रडावर: पुण्यालगतच्या गावात बसून फिरवतोय फोन, नेमका प्लॅन काय?

Gangster Gajanan marane News:गजा मारणे याच्या पत्नीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. कोथरूडमधील प्रभाग 10 मधून त्या निवडणूक लढवित आहेत.
Jayashree Marne Contesting From Ajit Pawar NCP
Jayashree Marne Contesting From Ajit Pawar NCPSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीत सध्या गुंडांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. राजकीय पक्षांकडून गुंडांना आणि गुंडांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे गुंडांच्या टोळ्या आपल्या कुटुंबातील व्यक्तींना निवडणुकीत विजयी करण्यासाठी सक्रिय झाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.

पोलिसांनी देखील या गुंडांची यादी तयार केली आहे. त्यांच्यावर स्पेशल सर्विलन्स सुरू केला आहे. या स्पेशल सर्विलन्स मध्येच कुख्यात गुंड गजा मारणे हा पत्नीला निवडणूकित विजयी करण्यासाठी सक्रिय झाला असल्याचं समोर आले आहे.

त्याला शहरात प्रवेशास मनाई असल्याने शहरालगतच्या गावातून कोथरूडमधील मतदारांना फोन करून प्रचार करत असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या तक्रारी पुणे पोलिसांकडे आल्या आहेत. गुंड मारणे आता पोलिसांच्या रडारवर आला असून पोलिसांनी या प्रकरणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

गजा मारणे याच्या पत्नीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. कोथरूडमधील प्रभाग 10 मधून त्या निवडणूक लढवित आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयाला तिकीट देण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आधीच टीका सुरू आहे. त्यातच आता गजा मारणे स्वतः प्रचारात उतरल्याचे समोर आल्याने हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई झालेल्या गजा मारणे याला अलीकडेच कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन देताना काही अटी व शर्थी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार तो निवडणुकी दरम्यान त्याला शहरात प्रवेश करता येत नाही. त्यामुळे तो शहराच्या हद्दीबाहेरूनच फोनाफोनी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Jayashree Marne Contesting From Ajit Pawar NCP
Madhavrao Gadgil Passed Away: ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड परिसरातील अनेक मतदारांना गजा मारणे याचे फोन आला असून, पत्नीला मदत करण्याचे आवाहन तो करत आहे. या फोनाफोनीमुळे मतदारांवर दबाव येत असल्याच्या तक्रारी देखील पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com