Mahesh Landge Vs Ajit Pawar : 'नैराश्य..अस्वस्थ, आत्मपरीक्षण करा, तुमचा मुलगा...', महेश लांडगे अजित पवारांना नको नको ते बोलले

PCMC Election Mahesh Landge Ajit Pawar : अजित पवारांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आमदार महेश लांडगे यांनी पवारांना जोरदार प्रत्युत्तर देत आत्मपरीक्ष करण्याचा सल्ला दिला.
 Mahesh- Landge Vs Ajit Pawar
Mahesh- Landge Vs Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mahesh Landge News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सभा घेत आमदार महेश लांडगेंवर नाव न घेता निशाणा साधला होता. भ्रष्टाचाऱ्याच्या आकाला संपवायचे आहे, असे म्हणत रिंग करून महापालिकेत भ्रष्टाचार केला जात असल्याचे ते म्हणाले होते. अजित पवारांच्या या आरोपानंतर महेश लांडगे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

महेश लाडंगे म्हणाले, 'ज्या महापालिकेत कधी काळी आपण कारभारी होते. त्या महापालिकेत 128 जागांवर उमेदवार देऊ शकलो नाही याचे नैराश्य अजित पवारांना आहे. ज्या पक्षाकडे कधीकाळी उमेदवारी घेण्यासाठी फार इच्छुक असायचे त्या पक्षाला सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नाहीत.'

'अजित पवारांची आरोप करण्याची जी सवय आहे आत्ताची नाही. मी राजकारण आलोय तेव्हापासून बघतोय निवडणूक आली की आरोप करायचे, याशिवाय त्यांना काही जमलं नाही.

विकासावर बोला, येवढे दिवस पालकमंत्री म्हणून तुम्ही काम केलं तरी देखील तुम्ही आरोपच करणार का? ते पण खोटे आरोप.', असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.

 Mahesh- Landge Vs Ajit Pawar
Pune Police: गुंड गजा मारणे पोलिसांच्या रडावर: पुण्यालगतच्या गावात बसून फिरवतोय फोन, नेमका प्लॅन काय?

आत्मपरीक्षण करा...

लांडगे यांनी त्यांच्यावर करण्यात येणार आरोपाबाबत बोलताना, आधी आपल्या लेकाचं बघा काय झालं ते, भाजपसोबत आल्याने तुम्हाला तुमचे गुन्हे लपवता येणार नाही. तुम्ही आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा, असा सल्ला देखील अजित पवारांना दिला. तसेच ते अस्वस्थ झाले आहेत. कारण त्यांना 128 उमेदवार उभे करता आले नाहीत, असा टोलाही लगावला.

 Mahesh- Landge Vs Ajit Pawar
Shiv Sena News: पुण्यात प्रचारात राडा! शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या गाडीवर दगडफेक; महिला उमेदवार जखमी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com