Ashok Kharat : वादग्रस्त कॅप्टन खरातचे सिन्नर कनेक्शन; औद्योगिक वसाहत अध्यक्षाला अटक!

Sinnar Industrial Estate Chairman Namkaran Aware Caught By Police : वादग्रस्त कॅप्टन खरात प्रकरणात सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून 'सीमा'चे अध्यक्ष आवारे यांना अटक केली आहे. यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
Sinnar Industrial Estate Chairman Namkaran Aware Caught By nashik Police
Sinnar Industrial Estate Chairman Namkaran Aware Caught By nashik Policesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. वादग्रस्त कॅप्टन खरात याला सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

  2. या प्रकरणात एका पतसंस्थेतील मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची चर्चा सुरू झाली आहे.

  3. सिन्नर औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष नामकर्ण आवारे यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.

Ashok Kharat News : वादग्रस्त कॅप्टन खरात याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा अधिक जोरात सुरू आहे. आता त्याला सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले असून एका पतसंस्थेतील मोठा गैरव्यवहार या निमित्ताने चर्चेत आला आहे. तर या प्रकरणात सिन्नर औद्योगिक वसाहतीच्या अध्यक्षाचे नाव समोर आले आहे. यामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

वादग्रस्त कॅप्टन अशोक खरात याला नाशिक पोलीस आणि एसआयटीने सिन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर शिर्डी पोलिसांनाही त्याची चौकशी करावयाची आहे. आता या प्रकरणात बेनामी व्यवहारांबाबत ईडीनेही तपास सुरू केला आहे. दरम्यान कॅप्टन खरात यांच्याशी संबंधित सिन्नर औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष नामकर्ण आवारे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

कुंदेवाडी (सिन्नर) येथील सहकारी पतसंस्थेत विविध बेनामी खाते असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या पतसंस्थेवर आवरे याचे वर्चस्व होते. सिन्नरमध्ये कॅप्टन खरात याला विविध नामांकित व्यक्तींची संपर्क करून देण्याचे काम आवारे याने केले होते.

Sinnar Industrial Estate Chairman Namkaran Aware Caught By nashik Police
Ashok Kharat ED case : ‘गुन्ह्यातील पैसा कुणाच्या खिशात?’ अशोक खरातला मुंबईत विशेष न्यायालयात बोलावलं

वादग्रस्त कॅप्टन अशोक खरात यांच्याशी आवारे यांचे कनिष्ठ संबंध असून आवारे यांनी लिहिलेल्या आत्मकथनात वादग्रस्त कॅप्टन खरात यांचा उदो उदो करण्यात आला आहे. आवारे याने खरात याचा उल्लेख गुरु असा केला होता. पण नंतर पोलिसांनी कारवाई केल्यावर आवरे याने घुमजाव केले होते.

सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांना सिन्नर पोलिसांकडून अटक झाल्याने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कॅप्टन खरातला सिन्नर पोलिसांनी रात्री ताब्यात घेतल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने त्यांना सुनावली आहे. जगदंबा पतसंस्थेतील बनावट खात्यातील व्यवहारांसंदर्भात चौकशी करण्यासाठी आवारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आज दुपारी चारच्या दरम्यान वसाहतीच्या कार्यालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना काही प्रश्नावली देऊन त्यांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, आवारे यांच्याकडून समर्पक, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सायंकाळी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Sinnar Industrial Estate Chairman Namkaran Aware Caught By nashik Police
Ashok Kharat Case : चाकणकरांच्या चौकशीवर ठाकरेंच्या नेत्याला संशय : चौकशी नावापुरतीच, नुसताच फार्स, कदाचित क्लिनचिट...

FAQs :

1. कॅप्टन खरातला कोणी ताब्यात घेतले?

सिन्नर पोलिसांनी कॅप्टन खरात याला ताब्यात घेतले आहे.

2. हे प्रकरण कशाशी संबंधित आहे?

हे प्रकरण एका पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित आहे.

3. या प्रकरणात आणखी कोणाचे नाव समोर आले आहे?

सिन्नर औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष नामकर्ण आवारे यांचे नाव समोर आले आहे.

4. नामकर्ण आवारे यांच्यावर काय कारवाई झाली?

पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

5. या घटनेमुळे काय चर्चा सुरू झाली आहे?

नाशिकमध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि सहकारी संस्थांमधील पारदर्शकतेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com