Baban Gholap : बाप भाजपात, मुलगा ठाकरे गटात ; बबनराव 'डबल गेम' खेळत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा...

Baban Gholap joins BJP while his son Yogesh stays with Shiv Sena (UBT) : गेल्या दोन दिवसांत नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडल्या आहेत. अनेक मातब्बर नेते व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून भाजप व शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Babanrao Gholap
Babanrao GholapSarkarnama
Published on
Updated on

Baban Gholap : गेल्या दोन दिवसांत नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडल्या आहेत. अनेक मातब्बर नेते व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून भाजप व शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये माजी समाजकल्याण मंत्री बबन घोलप यांचाही समावेश आहे. त्यांनी शिवसेना (उबाठा) गटाला पुन्हा एकदा सोड चिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दोन दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांचा भाजपात प्रवेश झाला. त्याचवेळी बबन घोलप यांचाही प्रवेश झाला. मात्र घोलप स्वत:भाजपात आले असले तरी त्यांचे पुत्र योगेश घोलप हे शिवसेना (उबाठा)पक्षातच कार्यरत आहेत. त्यामुळे 'दोन थडीवर हात' अशी टीका घोलप यांच्यावर राजकीय वर्तुळातून होत आहे.

घोलप यांची कन्या माजी महापौर नयना घोलप यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर कन्या तनुजा घोलप याआधीपासूनच भाजपमध्ये आहे. त्यामुळे सध्या बापलेकी भाजपमध्ये व मुलगा ठाकरे गटात आहे. वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्याच पक्षात असणे, ही बाब अनेकांना खटकली असून दोघांवर राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठली आहे.

Babanrao Gholap
Sudhakar Badgujar : सुधाकरभाऊ आता ठाकरेंची शिवसेना नाही, फडणवीसांची भाजप आहे’ ; थेट वागण्याची पद्धतच बदलावी लागणार

लोकसभेच्या निवडणुकीवेळी घोलप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर चार महिन्यांनी विधानसभा निवडणुका लागल्या असता या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी त्यांचे पुत्र योगेश घोलप यांना देण्यात आली. त्यामुळे घोलप यांनी पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला व त्यांचे पुत्र योगेश घोलप यांच्या प्रचारात सक्रीय झाले.

मात्र, या निवडणुकीत योगेश घोलप यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता पुन्हा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घोलप यांनी शिवसेना(उबाठा) पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पैसा व स्वार्थासाठी ते भाजपवासी झाल्याची टीका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी तर त्यांचा उल्लेख फिरता रंगमंच असाच केला. मात्र सुधाकर बडगुजर यांचा अनादर झाला, त्यामुळे त्यांच्यासोबत आपणही भाजपात आल्याचे घोलप यांनी म्हटलं आहे.

Babanrao Gholap
Special Executive Officer : सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार अधिकारी, निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून खास संधी!

देवळाली मतदारसंघात पाच वेळा आमदार राहिलेल्या बबन घोलप यांची राजकीय कारकीर्दी मोठी आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घोलप यांनी साथ सोडल्याने ठाकरे गटाला निश्चितच फटका बसणार आहे. शिवाय घोलप संस्थापक अध्यक्ष असलेली मनपाची सर्वात मोठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनाही आता भाजपप्रणीत होणार आहे. त्यामुळे घोलप यांच्या प्रवेशामुळे भाजपचाही मोठा फायदा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com