Nashik Politics : नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, अर्ज मागे घेऊ नये म्हणून भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनी घरात कोंडलं

Gyaneshwar Kakad lock his : बाहेरुन समर्थकांनी साखळी कुलूप लावून बंडखोर उमेदवार ज्ञानेश्वर काकड यांना त्यांच्या घरात कोंडून ठेवलं. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी यावेळी केला.
Gyaneshwar Kakad lock his house
Gyaneshwar Kakad lock his houseSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिकमध्ये भाजपमधील बंडखोरीने शुक्रवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय वळण घेतलं. नाशिक महापालिकेत भाजपाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर काकड यांनी बंडखोरी करत त्यांचा व त्यांच्या पत्नीच्या नावाने अपक्ष अर्ज भरला होता. ज्ञानेश्वर काकड यांनी अर्ज मागे घेऊ नये म्हणून त्यांच्या समर्थकांनीच त्यांना घरात कोंडल्याचा प्रकार घडला.

प्रभाग क्रमांक 6 मधून ज्ञानेश्वर काकड यांनी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने पत्नी व स्वत:च्या नावाचे असे दोन अपक्ष अर्ज दाखल केले होते. दुसरीकडे भाजप नेत्यांकडून बंडखोरांवर माघारीसाठी दबाव टाकला जात असल्याचे पाहाता काकड समर्थकांनी अर्ज माघार घेऊ नये म्हणून त्यांच्या कुटुंबाला घरात कोंडले, बाहेरून कुलूप देखील लावले.

अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज माघार घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांकडून घरात साखळी कुलूप लावून काकड यांना जेरबंद करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्यात आल्याचा आरोप काकड समर्थकांनी केला.

Gyaneshwar Kakad lock his house
Nashik BJP : नाशिक भाजपमध्ये झालेला एबी फॉर्मचा गोंधळ सुनियोजित होता का? शहराध्यक्षांच्या अहवालाने निर्माण झाला प्रश्न

दरम्यान प्रभाग क्रमांक 6 मधून अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर काकड यांनी एक अर्ज माघार घेतला तर पत्ती सुनिता ज्ञानेश्वर काकड यांचा अर्ज कायम ठेवल्याची माहिती मिळाली आहे. आपण निवडणूक लढवणार असून भाजपचे संघाचे निष्ठावान कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याची प्रतिक्रिया ज्ञानेश्वर काकड यांनी सरकारनामाशी बोलताना दिली. माझ्या नावाचा अर्ज मागे घेतला तर पत्नीच्या नावचा अर्ज कायम ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच हा प्रकार घडला. कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वर काकड यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला घरात कोंडले आणि कुलूप लावले. अर्ज मागे घ्यायचा नाही, अशी भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. नाशिकमध्ये ही बातमी पसरताच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी तत्काळ काकड यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.

Gyaneshwar Kakad lock his house
Nashik Municipal Election : आमदार सीमा हिरेंच्या तक्रारीची दखल मुख्यमंत्री घेतील का? की दुर्लक्षाची पुनरावृत्ती होणार..

दरम्यान नाशिकमध्ये बंडखोरांमुळे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, अनेक ठिकाणी इच्छुकांना डावलल्यात आल्याने इच्छुकांनी बंडखोरी करत काहींनी अपक्ष अर्ज भरले तर काहींनी मिळेल त्या पक्षाची उमेदवारी स्विकारत भाजपपुढे आव्हान उभे केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com