Nashik Politics : नाशिक महापालिकेसाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात, पुढच्या आठवड्यात मोठा धमाका!

Devendra Fadnavis Girish Mahajan : पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात भाजपमध्ये विरोधी पक्षातून मोठे इन्कमिंग होण्याची शक्यता आहे.
Girish Mahajan, Devendra Fadnavis
Girish Mahajan, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News : आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नाशिकला मोठे यश मिळेल, असा दावा केला आहे. मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याचे नक्की झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेही मोठी मोहीम हाती घेतली आहे.

भाजपने मोठ्या इन्कमिंगची तयारी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणते इच्छुक पक्ष बदलणार याची उत्सुकता आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणखी नवे पक्षप्रवेश करणार का? याविषयी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान केले आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असतील. यावेळी काय काय घडते? हे दिसून येईल, असे ते म्हणाले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने यापूर्वीच शिवसेना आणि अन्य पक्षांच्या मोठ्या नेत्यांचा भाजप प्रवेश केला होता. प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्याची मोठी झळ बसली. त्यामुळे शिवसेना आता सावध झाली आहे.

शहरात सुरुवातीला शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने प्रतिस्पर्धी पक्षांना खिळखिळे करण्यासाठी आघाडी घेतली होती. शिवसेनेचे बडे नेते शिंदे पक्षात गेले. त्यानंतर मात्र भाजप आक्रमक झाल्याने शिवसेना शिंदे पक्षाला नवे प्रवेश करता आले नाही.

सध्या मात्र शहरात गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यावर प्रशासनाचे लक्ष आहे. यामध्ये भाजपच्या तीन माजी नगरसेवकांवर कारवाई झाली आहे. शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी नगरसेवक सह आरपीआयचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांना अटक झाली आहे.

Girish Mahajan, Devendra Fadnavis
Girish Mahajan : नाशिकमध्ये इमारत पाडताना मंदिराचे नुकसान, गिरीश महाजनांनी तिथे जाऊन मागितली माफी

पोलिसांनी महापालिकेने गुन्हेगारीचे आरोप असलेल्या नेत्यांवर बुलडोझर चालवला आहे.त्यामुळे भाजप विरोधातील नाराजी दूर होऊ लागल्याचा दावा केला जातो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढच्या आठवड्यात नाशिकचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांचे प्रवेश होतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजप अधिक जोमाने कार्यरत झाला आहे.

Girish Mahajan, Devendra Fadnavis
Thane NCP : भाजप, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचाही स्वबळाचा नारा; अजितदादांच्या विश्वासू नेत्याने दिले संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com