राहुल क्षीरसागर
NCP News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत महायुती होणार नसल्याची चर्चा आहे. भाजपने स्वबळावाचा नारा दिल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी देखील ते स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी देखील स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.
ते म्हणाले, गेल्या २० वर्षांत महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराचे ओझे आम्ही वाहणार नाही. नवीन दिशा आणि वेळ ठरवून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आमचा निर्णय आम्ही महिन्याभरापूर्वीच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल यांना कळवला असल्याचे देखील मुल्ला यांनी स्पष्ट केले.
महायुती झाली नाही तर तीनही मित्रपक्ष ठाण्यात एकमेकांच्या विरोधात लढताना दिसून येतील. दरम्यान, नजीब मुल्ला म्हणाले, महापालिकेतील अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत पक्षाने वारंवार आवाज उठवला असून स्वबळावर लढण्याचा निर्णय हा ठाम असून नेते जो निर्णय घेतील, त्याचे पालन सर्व कार्यकर्त्यांनी करणे बंधनकारक असेल.
मागील निवडणुकीत पक्षाचे आठ नगरसेवक निवडून आले होते, तर सध्या 16 माजी नगरसेवक एकत्र असल्याचे मुल्ला यांनी सांगितले. तसेच आमची तयारी पूर्ण असून शिंदे सेना आणि भाजपच्या विरोधात लढण्याची भूमिका आम्ही निश्चित केली असल्याचे सांगितले.
मुंब्रा–कळवा परिसरातील नागरिकांकडून स्वबळावर लढा, आम्ही मताधिक्याने पाठिंबा देऊ, असा संदेश मिळाल्याचेही नजीब मुल्ला यांनी सांगितले. तसेच महापौर कोणाचा बसेल हे आम्ही सांगणार नाही, पण आमच्या मर्जीतलाच बसेल. ठाण्यात सिंहाचा वाटा आमचाच असणार,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच भाजप, शिवसेनेचा काही ठिकाणी बसला तरी शहरातील २० ते २५ जागा जिंकण्याचा आत्मविश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.