Girish Mahajan Politics : शेवटी महाजनच ठरले 'संकटमोचक', बडगुजर यांनीही मान्य केलं, सगळ्यांच्या नाकावर टिच्चून पक्षात घेतलं...

Girish Mahajan backs Sudhakar Badgujar’s BJP entry despite local opposition, key move in Nashik politics : स्थानिक पातळीवर होत असलेला वाढता विरोध पाहाता त्यामुळे बडगुजर यांच्या प्रवेशावर टांगती तलवार येते की, काय अशी भीती वाटत असताना प्रत्यक्षात मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून बडगुजर यांनी भाजपात प्रवेश करुन दाखवला.
Seema Hiray, Sudhakar Badgujar & Girish Mahajan
Seema Hiray, Sudhakar Badgujar & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik politics : पक्षविरोध भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर बडगुजर यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या. पण भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. नंतर सीमा हिरे यांच्या जोडीला इतर आमदार व स्थानिक पदाधिकारीही उभे राहिले. स्थानिक पातळीवर होत असलेला वाढता विरोध पाहाता त्यामुळे बडगुजर यांच्या प्रवेशावर टांगती तलवार येते की, काय अशी भीती वाटत असताना प्रत्यक्षात मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून बडगुजर यांनी भाजपात प्रवेश करुन दाखवला.

बडगुजर यांना गिरीश महाजन यांनी साथ दिल्यानेच ही किमया ते करु शकले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्याला बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल माहिती नसल्याचं म्हटलं. त्यावरुन बावनकुळे यांना अंधारात ठेवून बडगुजर यांच्या भाजपप्रवेशाची तयारी करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बावनकुळे यांचे मकाऊतील कसिनो बारमधील फोटो बडगुजर यांनीची खासदार संजय राऊतांना पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे या प्रवेशसोहळ्याला बावनकुळे हजर राहतील किंवा नाही याबाबत स्पष्टता नव्हती.

पण तेच बावनकुळे बडगुजर यांच्या पक्षसोहळ्यात हजर झाले कारण गिरीश महाजन यांनीच त्यांना फोन करुन बोलावून घेतलं. गिरीश महाजन यांच्याच पुढाकाराने बडगुजर यांचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात महाजन यांचेच धकते आहे असं सिद्द झालं आहे.

Seema Hiray, Sudhakar Badgujar & Girish Mahajan
Sudhakar Badgujar : कमळ हाती घेताच बडगुजर झाले 'निष्पाप', बावनकुळेंना दिला खास शब्द

भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाविरोधात स्थानिक तिन्ही आमदार एकत्र आले होते. नंतर भाजपच्या अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बडगुजर यांना पक्षात घेऊ नका म्हणून विरोध केला. आमदार सीमा हिरे यांनी तर हा विषय इतका प्रतिष्ठा केला की त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर मात्र बडगुजर यांचा प्रवेश होण्याची शक्यता काहीशी दूसर झाली होती. मात्र मंत्री महाजन यांनी पुन्हा चक्र फिरवली.

Seema Hiray, Sudhakar Badgujar & Girish Mahajan
Sudhakar Badgujar : बडगुजरांच्या प्रवेशाबाबत मुंबईतून मध्य रात्रीच आला आदेश, नाशिकमध्ये फोन खणाणला, नक्की काय घडलं?

नाशिक महापालिका निवडणुकीची सर्व जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर असणार आहे. त्यामुळे महाजन यांना जे हवं आहे तेच त्यांनी करुन दाखवलं. त्यांनी बडगुजर यांना विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांना थेट तंबी दिली. गप्प राहण्यासाठी सांगितलं. आपल्या स्टाईलने त्यांनी पदाधिकाऱ्यांना समज दिली. पक्षात कुणाला घ्यायचं कुणाला नाही यावर मतप्रदर्शन करु नये. सत्ता महत्वाची आहे, त्यासाठी एक एक जण महत्वाचा आहे. असा दम भरवत महाजन यांनी शेवटी सगळ्यांना गप्प करत हा पक्षप्रवेश घडवून आणला. महाजन यांच्यासमोर बोलण्याची हिंमतही कुणी केली नाही.

भाजपवासी झालेल्या सुधाकर बडगुजर यांनीही याची प्रत्यक्षपणे कबुली दिली. प्रवेश सोहळ्यात भाषण करताना त्यांनी महाजन यांचे आभार मानले. गिरीशभाऊ संकटमोचक आहेत, आपत्ती आली की ते मार्ग काढतात आणि त्यांनी माझा मार्ग काढला. असं बडगुजर यांनी म्हटलं. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या बडगुजर यांच्यासाठी महाजन हेच संकटमोचक ठरले असं म्हणता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com