Nashik Politics : मामा राजवाडे, सुनिल बागुल यांचा राजकीय गेम ; एकीकडे उबाठातून हकालपट्टी दुसरीकडे भाजप प्रवेशाला ब्रेक

BJP halts entry of Mama Rajwade and Sunil Bagul amid controversy, major political twist in Nashik politics : उबाठा खासदार संजय राऊत यांनी एक्सपोस्ट करुन भाजपवर टीकास्र सोडलं. त्याचा परिणाम असा झाला की, राजवाडे व बागुल यांच्या भाजपप्रवेशाला ब्रेक लागला आहे.
Sunil Bagul & Mama Rajwade
Sunil Bagul & Mama RajwadeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिकमध्ये स्फोटक घडामोडी घडत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुनिल बागुल व महानगरप्रमुख मामा राजवाडे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार होता. परंतु दोघांच्या प्रवेशावरुन उबाठा खासदार संजय राऊत यांनी एक्सपोस्ट करुन भाजपवर टीकास्र सोडलं. त्याचा परिणाम असा झाला की, राजवाडे व बागुल यांच्या भाजपप्रवेशाला ब्रेक लागला आहे. भाजपने दोघांचे पक्षप्रवेश थांबवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

तर दुसरीकडे संजय राऊत यांनी एक्स पोस्ट करुन पक्ष विरोधी कारवाया केल्याने उपनेते सुनील बागुल यांची शिवसेना (UBT) पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर महागरप्रमुख पदावरुन मामा राजवाडे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने प्रथमेश गीते यांची नाशिक महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यामुळे राजवाडे व बागुल दोघांनाही मोठा झटका बसला आहे. दोघांचाही आज दुपारी मुंबईत होणारा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे. एकीकडे भाजपने प्रवेश थांबवला आहे तर दुसरीकडे होतो त्या पक्षातून म्हणजे उबाठातून हकालपट्टी करण्यात आल्याने 'ना घर का ना घाट का' म्हणजेच न शिवसेनेत न भाजपात अशी अवस्था दोघांची झाली आहे.

Sunil Bagul & Mama Rajwade
Raut Vs Mahajan Politics: संजय राऊत यांच्या बाणाने एका दगडात दोन पक्षी, गिरीश महाजन अडकले त्यांच्याच जाळ्यात?

विलास शिंदे हे शिवसेना (शिंदे) पक्षात गेल्याने महानगरप्रमुख पदी उद्धव ठाकरे यांनी मामा राजवाडे यांची निवड केली होती. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, मामा राजवाडे व सुनिल बागुल यांच्यावर एका मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या दोन्ही नेत्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. पोलिस रेकॉर्डनुसार दोघांनाही फरारी दाखवण्यात आले. त्यानंतर अचानक दोघांच्याही भाजपप्रवेशाच्या बातम्या समोर आल्याने त्यावरुन संजय राऊत यांनी टीकेची झोठ उठवली.

Sunil Bagul & Mama Rajwade
Seema Hiray Politics: भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि बडगुजर यांच्यातील तणाव शिगेला, बडगुजर यांच्यावर केला गंभीर आरोप!

राउत यांनी एक्सपोस्ट करत म्हटलं की, नाशिक मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले…क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार व भाजपा साठी गुन्हेगार असलेल्या लोकांना भाजप पक्षात घेत आहे. म्हणजे तुमच्यावर गुन्हे दाखल असले तरच भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळतो. उद्या दाऊद इब्राहिमला सुद्दा भाजप पक्षात प्रवेश देईल. अशी टीका राऊत यांनी केली. यावरुन भाजपवर टीका होऊ लागल्याने भारतीय जनता पक्षाने हे प्रवेश थांबविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com