Nashik Activists With Ajit Pawar: नाशिक रोडचे कार्यकर्ते एका रात्रीत गेले अजितदादांबरोबर!

Nashik NCP Activists With Ajit Pawar: पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवारांच्या समर्थनासाठी झाले मुंबईला रवाना
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP Crisis News : सध्या महाराष्ट्रात चाललेल्या सत्तासंघर्षाच्या लाटेत नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठोस भूमिका घेतली आहे. नाशिक रोड परिसरातील कार्यकर्ते प्रारंभी शरद पवार यांच्याबरोबर जाण्याच्या मनस्थितीत होते. हे कार्यकर्ते आता अजित पवार यांच्याबरोबर जाणार आहेत. हे सर्व कार्यकर्ते आज सकाळी मुंबईला रवाना झाले आहेत. (Nashik Road party workers will go with Ajit Pawar)

राष्ट्रवादीच्या (NCP) देवळाली विधानसभा आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर आहेत. काल अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ (Chhaagn Bhujbal) यांनी कार्यकर्त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर हे कार्यकर्ते माघारी फिरले आहेत.

Ajit Pawar
NCP Sabha In Yeola: शरद पवारांचे भुजबळांना थेट आव्हान, ८ ला येवल्यात सभा!

कार्यकर्ते संभ्रमावस्थेत जायला नको म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. आम्ही पवार साहेबांचे निष्ठावान आहोत. मात्र बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी आता वेगळा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ तसेच पदाधिकाऱ्यांनी आवाहन केल्याने अजित पवार यांच्याबोरबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राचा एकच आवाज म्हणून अजित पवार आहेत, असे या वेळी पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले. अजित पवार यांच्या पाठीशी कोण याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक रोड येथील कार्यकर्ते सध्या एकवटले आहेत. पक्षाचे नाशिक रोड विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे यांनी आमचा विचार पक्का असल्याचे सांगितले आहे.

Ajit Pawar
Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांची साथ...? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

नाशिक रोड विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे, ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, विक्रम कोठुळे, चैतन्य देशमुख, मंगेश लांडगे, प्रशांत वाघ, माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.