Nashik Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर पोहचण्यासाठी नाशिककरांना चौथा पर्याय ; पांढुर्ली इंटरचेंजमुळे १४ किमी अंतर घटणार

Pandhurli Interchange Samruddhi mahamarg : समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी नाशिककरांना आता चौथा पर्याय उपलब्ध होणार असून, पांढुर्ली येथे नवीन इंटरचेंज उभारण्यात येणार आहे.
Samruddhi Highway News
Samruddhi Highway News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pandhurli Interchange Samruddhi mahamarg : नाशिककरांना मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर पोहोचण्यासाठी आता आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पांढुर्ली येथे नवीन इंटरचेंज उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या नव्या जोडरस्त्यामुळे समृद्धी महामार्गापर्यंतचे अंतर सुमारे १४ किलोमीटरने कमी होणार आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. नाशिककरांनाही या महामार्गाचा फायदा मुंबई आणि नागपूरसह औद्योगिक शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी होत आहे. सध्या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरी, भरवीर खुर्द (घोटी) आणि वावी (सिन्नर) येथील इंटरचेंजचा वापर करावा लागतो.

नाशिक शहरापासून इगतपुरी इंटरचेंज ४५ किलोमीटर, भरवीर खुर्द ४४ किलोमीटर, तर वावी ४० किलोमीटर अंतरावर आहे. इगतपुरीमार्गे समृद्धी महामार्गावर जाताना घोटी येथील टोल भरावा लागतो. यापूर्वी वाहनांसाठी १४५ रुपये टोल आकारला जात होता. टोलचे विभाजन केल्यानंतर घोटी येथे ७० रुपये, तर पुढे ठाण्यापर्यंत प्रवासासाठी ७५ रुपये द्यावे लागतात.

Samruddhi Highway News
Nashik Kumbh Mela : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘डिजिटल ट्विन’ तंत्रज्ञानाचा वापर ; पुरोचा धोका, गर्दीसह वाहतूक कोंडीचा आधीच येणार अंदाज

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नाशिककरांसाठी इगतपुरी, तर नागपूरकडे जाणाऱ्यांसाठी वावी इंटरचेंज सोयीचा ठरतो. घोटी, भगूर, देवळाली कॅम्प आणि नाशिक रोड परिसरातील वाहनधारकांना भरवीर खुर्द येथून महामार्ग गाठावा लागतो. मात्र, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पांढुर्ली येथे नवीन इंटरचेंज उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ३४३ कोटी रुपयांच्या निधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

Samruddhi Highway News
Nashik Kumbh Mela : रामकाल पथचे काम सुरु असताना आढळले प्राचीन शिवलिंग, नंदी अन् मंदिराचे अवशेष ; पुरातत्त्व विभागाचे काम थांबवण्याचे आदेश

निविदा प्रक्रिया वेगात

सोनारी ते भगूर आणि पांढुर्ली इंटरचेंजला जोडणाऱ्या नव्या रस्त्यामुळे नाशिक आणि समृद्धी महामार्ग यांच्यातील अंतर १४ किलोमीटरने कमी होणार आहे. या कामासाठी २४०.९९ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, पुढील टप्प्यात जोडरस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. नाशिकला समृद्धी महामार्गाशी थेट जोडणाऱ्या या रस्त्याची निविदा प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.