Vasant Gite News: सबंध महाराष्ट्रात भाजपने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची वाताहात केली. नाशिक महापालिकेतही भाजपने आपली सत्ता राखली. मात्र येथे शिवसेना ठाकरे पक्षाने अथक परिश्रम करीत एक चमत्कार घडवला.
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने आपल्या जागांमध्ये वाढ करीत एक हाती संपादित केली. यामध्ये यामध्ये बचावात्मक खेळी खेळणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरेला मोठा सेटबॅक बसला. उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या २३ जागा भाजपने हिसकावून घेतल्या.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने नाशिकच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी माजी आमदार वसंत गीते यांच्यावर सोपवली होती. अनेक नगरसेवक भाजपवासी झाले. शेवटच्या टप्प्यात ठाकरेंच्या व मनसेच्या हक्काच्या नेत्यांनी राजकीय सोय पाहत भाजप जवळ केला. त्यामुळे माजी आमदार गिते यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मदतीने लढत दिली.
माजी आमदार गीते यांचे चिरंजीव आणि माजी उपमहापौर प्रथमेश गीते प्रभाग १५ मध्ये उमेदवार होते. या प्रभागातील निवडणुकीवर भाजपच्या सर्व नेत्यांनी आपली ताकद लावली होती. विशेषता आमदार देवयानी फरांदे यांनी मतदानाच्या दिवशी येथे दिवसभर तळ ठोकला होता.
आज झालेल्या मतमोजणीत शिवसेनेचे तिन्ही उमेदवार सुरुवातीपासून पिछाडीवर होते. विशेषतः उपमहापौर गीते मोठ्या फरकाने मागे पडल्याने समर्थकांची चिंता वाढली होती. होम ग्राउंड वरच माजी आमदार गीते यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
या निवडणुकीत भाजपचे मिलिंद भालेराव यांचं तिन्ही उमेदवार आघाडीवर होते. हे आघाडी वाढल्यावर भाजपने विजय उत्सव सुरू केला होता. मात्र शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये हे चित्र शिवसेनेने पालटवले.
मागे पडलेले उपमहापौर प्रथमेश गीते यांनी शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये मोठी उसळी घेतली. हक्काच्या भागातून त्यांना मतदारांचा प्रतिसाद मिळाला. शेवटच्या फेरीत ते २३५० मताधिक्क्याने विजयी झाले. दुसऱ्या उमेदवार सीमा पवार यादेखील ६६१ मतांनी विजयी झाले आहेत. तिसरे उमेदवार माजी नगरसेवक गुलजार कोकणी हे मात्र पराभूत झाले.
राज्याच्या विविध महापालिकांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पीछेहाट झाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पहिली संयुक्त सभा नाशिक मध्ये घेतली होती. मात्र ही सभा मतांमध्ये परावर्तित झाली नाही, असेच म्हणावे लागेल.
यामध्ये नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार वसंत गीते यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती. शेवटच्या टप्प्यात मतदारांनी दिलेला कौल गीते यांना दिलासा देणारा ठरला. गेली तीस वर्ष होम ग्राउंड असलेले हे मैदान गीते यांनी मारलेच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.