नाशिकच्या शिवसेनेला कोरोनाची नव्हे तर निवडणुकीची भिती?

म्हसरूळ येथे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथप्रमुखांचा मेळावा झाला.
Shivsena office bearers in Programme

Shivsena office bearers in Programme

Sarkarnama

नाशिक : सध्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून (Uddhav Thakre) तर प्रशासनापर्यंत सगळ्यांना कोरोनाच्या (Covid) प्रसाराची काळजी आहे. त्यामुळे विविध बंधने लादली जात आहेत. मात्र नाशिकमध्ये शिवसेनेने (Shivsena) त्याची फारशी दखल घेतलेली दिसत नाही. ते रोजच मेळावे घेत गर्दी करत आहेत. कदाचीत त्यांना कोरोनापेक्षा महापालिका निवडणुकीची अधिक काळजी वाटते असे चित्र आहे.

<div class="paragraphs"><p>Shivsena office bearers in Programme</p></div>
मालेगाव स्फोटात गौप्यस्फोट; माजी IPS अधिकाऱ्याचे आर आर पाटलांकडे बोट!

या संदर्भात रविवारी म्हसरूळ येथे मेळावा झाला. यावेळी सक्षम बूथ रचना आणि बूथप्रमुखांमुळेच निवडणुका जिंकता येतात. याची जाणीव झाल्यानेच सर्व पक्ष या दोन्ही गोष्टींना विशेष महत्त्व देतात. शिवसेनेने तर बूथप्रमुखांचे व्यापक जाळे विणून त्यांना सतत प्रोत्साहित केले आहे, असे प्रतिपादन शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. दत्ता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला.

<div class="paragraphs"><p>Shivsena office bearers in Programme</p></div>
धक्कादायक; `जीवना`साठी `त्या` रोज देतात मृत्यूला हुलकावणी!

बूथ रचना सक्षम करण्यात शिवसेनेने मोठी आघाडी घेतली आहे. प्रत्येक बुथप्रमुखाला आपण सातत्याने प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे कोणतेही आव्हान पेलण्यासाठी तो सक्षम आहे याची हमी मी आपणा सर्वांच्या साक्षीने देतो, असे बडगुजर यांनी बूथप्रमुखांना उद्देशून सांगितले. माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी बूथप्रमुखांचे कार्य आणि अधिकारांची माहिती या वेळी दिली. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्ता काबीज करायची असल्याने बूथप्रमुखांना डोळ्यात तेल घालून आपली भूमिका चोखपणे पार पाडावी लागेल, असे सांगताना राज्यात आपली सत्ता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कामगिरी दमदार असल्याने आपल्यासाठी वातावरण पोषक आहे आणि त्याचाच लाभ उचलून आपणास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी आतापासूनच तयारीस लागावे लागेल, असे आवाहन केले.

‘शिवसेना मनामनात, शिवबंधन घराघरांत हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. या वेळी शिवसैनिक, बूथप्रमुख, पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले. या वेळी योगेश बेलदार, राजेंद्र वाकसरे, सुनील देवकर, कल्पेश पिंगळे, अंकुश काकड, अविनाश काकडे, दत्ता थोरात, सुरेश जाधव, सूरज दमकोंडे, अमोल राठोड, विशाल मोराडे, सुनील हाटकर, बाबा म्हस्के, दीपक अतरते आदींसह बूथप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी व्यासपीठावर महिला आघाडी जिल्हा संघटक मंगला भास्कर, शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, शैलेश सूर्यवंशी, समन्वयक विशाल कदम, सुनील निरगुडे, महिला पदाधिकारी ज्योती देवरे, स्वाती पाटील, कल्पना पिंगळे, स्वाती म्हस्के, शिवसेना विभागप्रमुख संजय पिंगळे, संतोष पेलमहाले आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com