CJP Youth News: कॉकरोच जनता पार्टीच्या युवा आंदोलनाला मोठे यश मिळाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्याबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी या राजीनामाचे स्वागत केले. हा राजीनामा सहज झालेला नाही. युवकांनी शांततापूर्ण आणि संघटित राहून दिलेला लढा राजीनाम्याला कारणीभूत आहे.
विशेष म्हणजे नवी दिल्लीत जंतर-मंतर मैदानावर सीजेपी पक्षाचे आंदोलन झाले. त्याला सुरुवातीपासून नाशिकच्या राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्करराव भगरे आणि काँग्रेसच्या डॉ शोभा बच्छाव यांनी पाठिंबा दिला होता. हे तिघेही जंतर-मंतर येथील आंदोलनात सहभागी झाले होते.
खासदार वाजे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला हे योग्य पाऊल असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने याआधीच हा निर्णय घ्यायला हवा होता. आंदोलकांवर दबावाचे व लाठीमार असे गैरप्रकार टाळता आली असते.
केवळ शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन प्रश्न सुटणार नाही. या उलट आता केंद्र सरकारची जबाबदारी अधिक वाढली आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन का केले? व त्यांचा मूळ हेतू काय हे केंद्र सरकारला समजून घ्यावे लागेल.
नीट परीक्षा प्रश्नपत्रिका कुठल्या हे अतिशय वाईट होते. हे प्रकार भविष्यात होणार नाहीत याचा बंदोबस्त करावा लागेल. आपली राजकीय हेतू आणि स्वार्थ बाजूला ठेवून शिक्षण क्षेत्रात सुधारणांचे काम तातडीने हाती घ्यावी लागेल.
देशभरातील विद्यार्थ्यांनी या आंदोलनात भाग घेतला. हे सहज किंवा सोपे काम नव्हते. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने त्याचे समर्थन केले होते. पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी याबाबत मुंबईत तिरंगा मार्च काढण्याचे जाहीर केले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.