

Nashik Kumbh Mela News: सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असूनही अनेक विकासकामे अर्धवट आहेत. साधूग्रामच्या उभारणीसह अनेक विकासकामे संथ गतीने सुरू असल्याने साधूंनी नाराजी व्यक्त केली आहे. साधूग्रामसाठी भूसंपादन रखडले असून, शेतकऱ्यांना पूर्वीचा मोबदलाही मिळालेला नसल्याचा मुद्दा पुढे आला आहे. महापालिकेने शेतकऱ्यांचे पैसे तातडीने अदा करावेत; अन्यथा साधू शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतील, असा इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत संजयदास यांनी दिला.
सत्ताधारी महायुतीचे मंत्री निलेश राणे यांनी कुंभमेळा हा हिंदूंचा आहे. त्यात भाविकांनी मुस्लिम दुकानदारांकडून कोणतेही साहित्य खरेदी करू नये. मुस्लिमांनी कुंभमेळ्यात सहभागी होऊ नये, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत संजयदास यांनी मात्र सनातन आणि हिंदू धर्माचा प्रवाह सर्वव्यापी आहे. त्यात हिंदू भाविकांबरोबरच मुस्लिम आणि अन्य धर्मीय नागरिक देखील शुद्ध मनाने सहभागी होऊ शकतात. ही परंपरा प्रदीर्घकाळ सुरू आहे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मंत्री राणे यांना साधूनींच चपराक दिली आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे पुरोहित संघाचे ध्वजारोहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 31 ऑक्टोबरला होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध आखाड्यांचे प्रमुख महंत शहरात दाखल होऊ लागले आहेत. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत संजयदास मंगळवारी नाशिक शहरात दाखल झाले. कुंभमेळ्याच्या कामकाजाविषयी त्यांनी आज शहरातील पत्रकारांची संवाद साधला. आखाडा परिषदेच्या दृष्टीने साधू ग्राम महत्त्वाचे आहे. प्रशासनाने यासंदर्भात साधना आखणी केलेले भूखंड आणि साधू ग्राम जागा सोपविण्याचे काम सुरू करावे, अशी अपेक्षा महंत संजय दास यांनी व्यक्त केली.
आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष महंत ज्ञानदास महाराज, त्यांचे उत्तराधिकारी महंत संजयदास यांचे विविध साधू शहरात दाखल झाले आहेत. आज सायंकाळी महापालिका तसेच कुंभमेळ्याचे आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांसमित त्यांची बैठक होईल. यावेळी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीची व जागेची देखील पाहणी करण्यात येणार आहे असे महंत संजय दास यांनी सांगितले.
कुंभमेळ्याचे अमृत स्नान ज्या ठिकाणी होणार आहे, त्या रामकुंडावरील पायऱ्यांमध्ये तांत्रिक त्रुटी आहेत. याशिवाय शहरातील अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. या कामांची गती अतिशय संथ आहे. त्यामुळे त्याचा सिंहस्थावर परिणाम होईल.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणाऱ्या गोदा आरतीला शैव आणि वैष्णव दोन्हीपंथाचे साधू एकत्र येणार आहेत. त्याबाबत महंत संजय दास यांनी आनंद व्यक्त केला. मात्र ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची जागा आणि अंतर याचा विचार करता अन्य उपक्रमांसाठी दोन्ही पंथांचे साधून एकत्र येण्याची शक्यता मात्र त्यांनी फेटाळून लावली.
'साधूग्राम'साठी भूसंपादन अद्याप सुरू झालेले नाही. शेतकऱ्यांना यापूर्वीचा मोबदला मिळालेला नसल्याने काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महंत संजय दास यांनी नाशिक महापालिकेने शेतकऱ्यांचे पैसे तातडीने अदा करावेत. त्याबाबत विलंब झाल्यास साधू शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतील असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.