

Mumabi News : शिवसेना पक्ष, चिन्हावर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. गेल्या महिनाभरापासून कोर्टात सुनावणी सुरु आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी बाजू मांडली. त्यानंतर बुधवारी सुनावणीवेळी एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी यावर जोरदार युक्तिवाद केला. शिंदेंच्या शिवसेनेचे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी संघटनात्मक रचनेतील निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळेस व्हीप, पक्षांतर्गत निवडणुकांवरून त्यांनी घेरले. या प्रकरणावर पुन्हा गुरुवारी सुनावणी होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ध्रुव मेहता बाजू मांडणार आहेत.
शिवसेना (Shivsena) कुणाची, या बहुचर्चित प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वकिलांनी गुरुवारी आपले युक्तिवाद सादर केले आहेत. वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी संघटनात्मक रचनेतील निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. जर संघटनेत निवडणुका होत नसतील, तर त्या आधारावर पक्ष कोणाचा हे ठरवणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी केला.
त्यासोबतच निर्देशन पद्धत वापरून पक्षप्रमुखाची निवड करण्याच्या पद्धतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनादुरुस्तीनंतर पक्षांतर्गत नेमणुका निवडणुकांविना झाल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. पक्षावर बहुमत कोणाकडे आहे, हे संख्याबळावर ठरते, असेही त्यांनी नमूद केले.
मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे दुसरे वकील ध्रुव मेहता यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर युक्तिवाद केला. एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते होते आणि 21 जून रोजी झालेल्या आमदारांच्या बैठकीत भरत गोगावले यांना व्हीप म्हणून निवडण्यात आले होते, असे मेहता यांनी सांगितले.
त्यासोबतच भरत गोगावले यांनीच काढलेला व्हीप आमदारांनी मानला, असा युक्तिवाद त्यांनी केला, तसेच मूळ याचिकेतील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर पुन्हा गुरुवारी सुनावणी होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ध्रुव मेहता बाजू मांडणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.