Nashik ZP election : सिन्नर तालुक्याच्या राजकारणात भाजपने मोठी खेळी खेळली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरातच झेंडा फडकवला आहे. काल माणिकराव कोकाटे यांचे सख्खे बंधू भारत कोकाटे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सिन्नर तालुक्याच्या राजकारणाची सगळी समीकरणचं बदलली आहे.
भारत कोकाटे व माणिकराव कोकाटे यांची मतभेत आहेत. त्याचाच फायदा भाजपने घेतल्याचे दिसत आहे. कौटुंबिक कलहामुळेच भारत कोकाटे यांनी मंत्री कोकाटे यांची साथ सोडली होती. त्यांनी २०२२ मध्ये शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. वाजेंना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका त्यांनी निभावली होती.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंधू भारत कोकाटे यांचा भाजपप्रवेश माणिकराव कोकाटे यांच्यासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. कारण भारत कोकाटे यांचा भाजपप्रवेश हा माणिकराव कोकाटे यांची कन्या सिमंतिनी कोकाटे यांच्या राजकीय वाटचाली समोरचा फार मोठा अडथळा होऊ शकतो. त्याचीच चर्चा सध्या सिन्नरच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. (Nashik Politics)
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सिमंतिनी कोकाटे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. सिमंतिनी कोकाटे या सोमठाणे गटातून निवडणुक लढवण्यास इच्छुक आहे. हा गट आता ओबीसींसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे सीमांतिनी कोकाटे यांनी पुन्हा निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. तर याच गटातून भारत कोकाटे यांची दोन वर्षांपासून तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे दोघांकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यास सोमठाणे गटातून काका-पुतणी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
दरम्यान भारत कोकाटे यांनी भाजप प्रवेशानंतर म्हटलं की, भाऊ माणिकराव कोकाटे यांच्यासोबत आपले केवळ राजकीय मतभेद आहेत. कौटुंबिक नाही. ज्याप्रकारे बंधू माणिकराव यांनी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले त्याप्रमाणे मीही स्थान निर्माण करु इच्छितो असे भारत कोकाटे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.