Kishor Darade On Vivek Kolhe : 'ही आत्ताची पोरं, मी 16 जणांचे डिपाॅझिट जप्त केलयं'; आमदार दराडेंनी कोल्हेंना डिवचलं

Nashik Teachers Vidhan Parishad MLA Kishore Darade Press Conference : विवेक कोल्हे म्हणजे, आता आलेले पोरं आहे. शिक्षण क्षेत्रातील एकही गोष्ट सांगता येणार नाही. मी 18 दिवसात निवडणूक लढतो आणि जिंकून आलो आहे. 16 जणांची अनामत रक्कम जप्त केली. त्यामुळे हे माझे स्पर्धक नाही, असे आमदार किशोर दराडे यांनी म्हटले आहे.
Kishor Darade On Vivek Kolhe
Kishor Darade On Vivek Kolhesarkarnama

Kishor Darade News : नाशिक शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. ही विवेक कोल्हे यांच्या झंझावातसमोर आमदार किशोर दराडे यांनी देखील फिल्डिंग लावली आहे.

"ही आत्ताची पोरं आहे. त्यांना शिक्षण क्षेत्रातील एकही गोष्ट सांगता येणार नाही. मी 18 दिवसात निवडणूक जिंकलो आणि 16 जणांचे डिपाॅझिट जप्त केले. त्यामुळे या निवडणुकीत माझे कोणीच स्पर्धक नाही", असे म्हणत आमदार किशोर दराडे यांनी विवेक कोल्हे यांना डिवचले आहे.

शिवसेना एकनाथ मुख्यमंत्री गटाचे उमेदवार किशोर दराडे नाशिक शिक्षक विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत. गेली निवडणूक ते अपक्ष लढले होते. त्यांना शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) पाठिंबा दिला होता. निवडणुकीनंतर ते शिवेसनेच्या जवळ गेले.

शिवेसना फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झाले. या निवडणुकीत महायुतीचा त्यांना पाठिंबा असल्याचा त्यांचा दावा आहे. गेल्या पेक्षा ही निवडणूक चर्चेत आली आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी आमदार किशोर दराडे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात आमदार दराडे आणि कोल्हे यांच्यात सामना रंगण्याची चिन्हं आहे.

Kishor Darade On Vivek Kolhe
Vivek Kolhe : 'टीडीएफ' संभ्रमात, आणखी एक गट फुटला; विवेक कोल्हेंच्या संपर्कात गेला!

आमदार किशोर दराडे यांनी आज नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन नाशिक शिक्षक मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून रंगवण्यात आलेल्या 'ड्राम्या'वर भाष्य केले. "माझ्याभोवती षडयंत्र रचले गेले. डमी उमेदवार उभा केला. तो कोपरगावचा होता. त्याला कोणाची फूस होती, हे देखील तपासा, म्हणजे सर्व चित्र स्पष्ट होईल.

ही आत्ताची पोरं आहेत. त्यांना शिक्षण क्षेत्रातील काय प्रश्नांची जाण असणार आहे. मी 18 दिवसात निवडणुकीला समोरे गेलेलो माणूस आहे. यात 16 जणांचे डिपाॅझिट जप्त केले आहे. या पोरांना शिक्षण क्षेत्रातील काहीच सांगता येणार नाही. माझ्यावर जुनेच आरोप करण्यात धन्यता मानत आहे. त्यात काही तथ्य नाही. त्यामुळे माझा पाठिंबा वाढत आहे", असे किशोर दराडे यांनी म्हटले.

Kishor Darade On Vivek Kolhe
Radhakrishna Vikhe On Congress : काँग्रेसकडून 'खटाखट' घ्या; मंत्री विखेंनी ठोकला शड्डू!

'टीडीएफ'चे खूप प्रकार

अनेक शिक्षक संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती बरोबर आहेत. 'टीडीएफ'चे खूप प्रकार असून, नाशिक, जळगाव, नगर जिल्ह्यातूनही या संघटनेचा पाठिंबा मिळालेला आहे. शिक्षक मतदार संघाच्या इतिहासात सर्वाधिक पंधराशे कोटी रुपयांचा निधी उत्तर महाराष्ट्रात आणला. शिक्षकांची सर्व बिले निघाली. शिक्षक भरतीचा प्रश्‍न सोडविण्याचे काम केले.

अनुकंपाचे ऑर्डर, शालर्थ आयडी, आश्रम शाळेतील प्रश्‍न, नॅशनल बँकेतून पगार हे प्रश्‍न सोडविल्याने शिक्षकांचा कौल आपल्याकडे आहे. नगर जिल्ह्यातील वाडी-वस्तीवरील शाळांमध्ये संगणक प्रिंटर पोहचविण्याचे काम केले. त्यामुळे सर्व शिक्षक वर्गापर्यंत कामातून पोहचलो आहे. स्पर्धा कोणाशीही नसून, आत्ता आलेली पोरं ज्यांना शिक्षण क्षेत्रातील काहीही सांगता येणार नाही. मात्र शिक्षण क्षेत्रातील रतीमहारती माझ्याबरोबर असल्याचा काॅन्फिडंट किशोर दराडे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com