Tribal Development Corporation recruitment scam : आदिवासी विकासाच्या 'त्या' नोकरभरती घोटाळ्यात मोठा निर्णय; 350 कोटींचा गैरव्यवहार...

Nashik Tribal Development Recruitment Scam Pune Kunal IT Services Blacklisted in Shabari Mahamandal Irregularities : आदिवासी विकास व शबरी महामंडळाच्या नोकरभरतीत अनियमितता झाल्याप्रकरणी कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता.
Tribal Development Corporation recruitment scam
Tribal Development Corporation recruitment scamSarkarnama
Published on
Updated on

Nashik tribal development recruitment scam : नाशिक इथल्या आदिवासी विकास व शबरी महामंडळातील 584 पदांच्या नोकरभरतीत दोषी आढळलेल्या पुण्यातील कुणाल आयटी सर्व्हिसेस या कंपनीला विभागाने काळ्या यादीत टाकले आहे.

महामंडळाच्या नोकरभरतीत अनियमितता झाल्याप्रकरणी कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. सरकारने त्याला मान्यता दिल्याचा दुजोरा आदिवासी विकास विभागाचे आयुक्त लीना बनसोड यांनी दिला.

आदिवासी विकास महामंडळ व शबरी वित्त व विकास महामंडळाने 2016 मध्ये भरती प्रक्रिया राबवली होती. विभागाने सरकारमान्य संस्था सोडून पुण्यातील (Pune) खासगी कुणाल आयटी सर्व्हिसेस संस्थेकडून नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात 361 पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली होती. त्यासाठी तब्बल 36 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. परंतु, तत्कालीन अधिकारी आणि कंपनीने या नोकरभरतीत घोटाळा केला.

यात महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव, प्रशासन अधिकारी नरेंद्र मांदळे यांच्यासह कुणाल आयटी यांचाही सहभाग आढळला होता. महामंडळाच्या लीना बनसोड यांनी याबाबत आदिवासी विभागाकडे पाठपुरावा केला. तसेच संबधित कंपनीला काळ्या यादीत पाठविण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकत, मोठा दणका दिला आहे.

Tribal Development Corporation recruitment scam
Riteish Deshmukh Emotional Post: विलासराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त रितेश देशमुखची भावनिक पोस्ट, म्हटले...

350 कोटींचा गैरव्यवहार

अधिकाऱ्यांसह ठेकेदारांनी नात्या गोत्यांचा भरणा केल्याने भाजपचे (BJP) दिंडोरीचे तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी या भरती प्रक्रियेत 350 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर फडणवीस यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्यामार्फत चौकशी केली.

Tribal Development Corporation recruitment scam
BJP local election: भाजपने अमित शहाच्या उपस्थित फुंकले 'स्थानिक'च्या निवडणुकीचे रणशिंग; महायुतीच्या निर्णयाकडे लक्ष

गुन्हे दाखल

दरम्यान, बहुचर्चित नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी डिसेंबर 2021 मध्ये आदिवासी विकास महामंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे, चौकशी अधिकारी तथा तत्कालीन अपर आयुक्त अशोक लोखंडे या दोन बड्या अधिकाऱ्यांसह कुणाल आयटीचे संचालक संतोष कोल्हे याच्याविरुद्ध गुन्हे देखील दाखल झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com