Nashik Trible News: नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात आहे. मंत्र्यांपासून तर मुख्यमंत्र्यांच्या प्रचार दौऱ्यांचे नियोजन होत. मात्र याच जिल्ह्यात आज आदिवासी विद्यार्थ्यांचा धक्कादायक प्रश्न समोर आला.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू आहे. सत्ताधारी पक्षाच्या विविध मंत्र्यांच्या बैठका होत आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी महायुतीतील तीन मंत्री या जिल्ह्याला लाभले आहेत.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी हजारो कोटींच्या घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. मात्र याच जिल्ह्यात आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षक मिळावा म्हणून एक वेगळे पाऊल उचलले.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा हा आदिवासी आणि दुर्गम तालुका आहे. गुजरात राज्याच्या सीमेवरील पिंपळसौंड गावी शाळा आहे मात्र शिक्षकांची कमतरता आहे. गेले अनेक महिने पाठपुरावा करू नये त्याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ मिळाला नाही.
आज सकाळी पिंपळसोंड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी एक वेगळे पाऊल उचलले. गावातील पालक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी चक्क ४० किलोमीटर पायपीट करीत सुरगाणा गाठले. येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात त्यांनी आपली कैफियत मांडली. -
येथील शाळेत वर्ग खोल्यांची कमतरता आहे. हक्काचा शिक्षक विद्यार्थ्यांना नाही. त्यामुळे या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे. हा प्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा, माघारी गावी जाणार नाही अशी भूमिका या विद्यार्थी आणि पालकांनी घेतली.
एकीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत. दुसरीकडे शासन हजारो कोटींच्या योजनांचा गाजावाजा करीत आहे. महापालिका निवडणुकीत नाशिक शहरात हजारो कोटींच्या घोषणांची आश्वासने दिली जात आहेत. मात्र त्याच जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवड आहे. शाळा आहे मात्र वर्गासाठी खोली नाही, शिक्षक नाही असा विरोधाभास आहे.
यासंदर्भात आठ दहा वर्षांच्या मुलांनी गुजरातच्या सीमेवरील आपल्या पिंपळसोंड गावातून चक्क ४० किलोमीटरची पायपीट केली. ही पायपीट शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी होती. तीन मंत्री असलेल्या आणि त्यातही एक आदिवासी मंत्री असलेल्या जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांचीच ही दुरावस्था धक्कादायक अशीच आहे. शिक्षणाधिकारी 40 किलोमीटर पायपीट करीत आलेल्या या विद्यार्थ्यांना न्याय देतील का? याची उत्सुकता आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.