Bacchu Kadu Politics: नाशिकच्या शेतकरी आंदोलनात बच्चू कडू यांचीही उडी; शेतकऱ्यांचा लढा उभारणार!

Nashik Trimbakeshwar farmers' protest, farmers' request to Bachchu Kadu, Kadu will hit Nashik after the Nagpur protest -नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आणि इतर संकटग्रस्त शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांची वर्धा येथे भेट घेतली
Bacchu Kadu & Nashik Farmers
Bacchu Kadu & Nashik FarmersSarkarnama
Published on
Updated on

Bachchu Kadu News: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने विविध कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी त्र्यंबकेश्वर रोड आणि घोटी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर संकट आले आहे. या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या घरांवर आणि इमारतींवर 'एनएमआरडीए'ने हातोडा चालवला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. मात्र कैलास खांडवाले यांनी साखळी उपोषण सुरूच ठेवले आहे.

https://www.sarkarnama.in/topic/prahar

या आंदोलनात आता प्रहार संघटनेचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी देखील पुढे घेतली आहे. नागपूर येथील शेतकऱ्यांचे आंदोलन झाल्यानंतर ते नाशिकला येणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांना त्यांनी पाठिंबा व्यक्त केला.

Bacchu Kadu & Nashik Farmers
Eknath Khadse : धक्कादायक, पेट्रोलपंपानंतर एकनाथ खडसेंच्या घरावरही चोरट्यांचा डल्ला ; सगळी कपाटं फोडून अंगठ्या, रोकड लंपास

अंबड आणि राजुर येथील शेतकरी प्रकल्पग्रस्त झाले आहेत. ठिकाणी औद्योगिक भूसंपादन होणार आहे. घोटी ते त्र्यंबकेश्वर रस्त्यासाठी इगतपुरी तालुक्यात जमिनी संपादित होत आहेत. त्र्यंबकेश्वर पेगलवाडी, अडवन येथील शेतकऱ्यांना देखील नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या या शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांचा धावा केला आहे.

Bacchu Kadu & Nashik Farmers
Nashik Crime : आरपीआय नेता प्रकाश लोंढेच्या टोळीवर मोक्का, निवडणुकीच्या तोंडावर रामदास आठवलेंना मोठा धक्का

नाशिकहून प्रहार संघटनेच्या नागपूर येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी हे शेतकरी गेले आहे. सोमवारी रात्री वर्धा येथे त्यांनी माजी आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली. मध्यरात्री सुमारे अर्धा तास नाशिकच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.

नागपूरच्या आंदोलनासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात साहेबराव दातीर, शांताराम फडोळ, भाऊसाहेब दातीर, विष्णू कोकणे, शरद कडैल, गोरख दातीर, नवनाथ कोकणे, नामदेव कोकणे, तुकाराम कोकणे, सुरेश कोकणे, सोपान परदेशीं, ज्ञानेश्वर गटकळ आदींचा समावेश आहे.

इगतपुरी तालुक्यात विविध पाटबंधारे आणि महामार्ग या प्रकल्पांमुळे शेतकरी आधीच भूमिहीन झाला आहे. आता औद्योगीकरण आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संपादन होत आहे. शेतकऱ्यांना विस्थापित करून त्यांचे कंबरडे मोडण्याचाच हा प्रकार आहे, अशी तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकेश्वर येथील ‘एनएमआरडीए’ प्रकल्पाच्या भूसंपादनाला आणि घरांवरील कारवाईला स्थगिती दिली आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे आगामी काळात या प्रश्नावर आंदोलन उभे राहण्याची चिन्हे आहेत.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com