Prakash Londhe : नाशिकमध्ये यूपी पॅटर्न, लोंढे टोळीचा कारभार जिथून चालायचा 'त्या' इमारतीवरच चालवला 'बुलडोजर'

Prakash Londhe's unauthorized building demolished : आरपीआय नेते प्रकाश लोंढे यांच्या अनधिकृत इमारतीवर महापालिकेने गुरुवारी बुलडोजर चालवला. यावेळी काही अनुचित घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
Prakash Londhe's unauthorized building demolished
Prakash Londhe's unauthorized building demolishedSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : उत्तर प्रदेशातील 'बुलडोझर पॅटर्न'ची अंमलबजावणी नाशिक शहरात सुरू झाली आहे. त्याअंतर्गत खंडणी आणि गोळीबार प्रकरणातील संशयित प्रकाश लोंढे यांची आयटीआय सिग्नल-खुटवडनगर मार्गावर असलेली अनधिकृत इमारत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडण्यास सुरुवात केली आहे. याच इमारतीमधून लोंढें टोळीचा कारभार चालत होता. गुरुवारी सकाळपासून ही इमारत पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाली.

गुरुवारी सकाळी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या उपस्थितीत या कारवाईला सुरुवात झाली असून याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी देखील याठिकाणचे काही अतिक्रमण पालिकेने हटवले. या कारवाईनंतर परिसरातील इतर बेकायदा बांधकामांवरही महापालिका हातोडा चालविण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक राजकारणातही या कारवाईचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

एकीकडे नाशिक पोलिसांकडून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात असताना आता महापालिकेनेही पोलिसांना साथ देत गुन्हेगारांच्या अनधिकृत मालमत्तेवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लोंढे यांच्या या इमारतीचे बांधकाम नंदिनी नदीच्या पूररेषेत आढळले होते. या संदर्भात महापालिकेने कागदपत्रे सादर करण्याची नोटीस लोंढेना बजावली होती . पंरतु दिलेल्या मुदतीत लोंढे वा त्यांच्यावतीने कुणीही कागदपत्रे सादर करण्यास पुढे आले नाही. दिलेली मुदत संपल्याने अखेर पालिकेने या इमारतीवर बुलडोजर चालवला आहे.

Prakash Londhe's unauthorized building demolished
Nashik Central Jail : धक्कादायक : नाशिकच्या कारागृहात कैद्यांची 'गांजापार्टी', फोटो व व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, या अतिक्रमणप्रकरणी लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेला जो काही खर्च येणार आहे तो सर्व खर्च लोंढेंकडून वसूल केला जाणार आहे. लोंढे याने तयार केलेले अनधिकृत पक्के बांधकाम तोडण्यासाठी जेसीबी जाण्यासाठी रस्ता नसल्याने तो तयार करण्याचे नियोजन महापालिकेतर्फे करण्यात आले. यानंतर अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यात येत आहे. साधरण दिवसभरात इमारत जमीनदोस्त करण्याचे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

Prakash Londhe's unauthorized building demolished
Nashik Crime: कारवाई टाळण्यासाठी बागुल भाजपमध्ये गेले, पण पोलिसांनी पद्धतशीर गेम केला! पडद्यामागे काय घडले?

दरम्यान सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे आजूनही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी त्याचे वडील प्रकाश लोंढे व भाऊ दीपक लोंढे या दोघांना सहआरोपी केलं आहे. १७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com