Nashik Central Jail : धक्कादायक : नाशिकच्या कारागृहात कैद्यांची 'गांजापार्टी', फोटो व व्हिडीओ व्हायरल

Nashik Jail Viral Video: नाशिकच्या कारागृहात कैदी गांजा व इतर अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कारागृह प्रशासनाकडून याबाबत तपास केला जात आहे.
Nashik Jail Viral Video
Nashik Jail Viral VideoSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी सुरु केलेली 'कायद्याचा बालेकिल्ला' ही मोहीम राज्यभरात चर्चेत आहे. पोलिसांच्या धाकाने एकीकडे अनेक गुन्हेगार बिळात लपून बसले आहेत. तर दुसरीकडे नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडून कायदा धाब्यावर बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून गांजासह अमली पदार्थांचे सेवन करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओत दिसणाऱ्या कैद्यांवर मकोका व खूनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कारागृहात कैद्यांना मोबाईल फोन कसा उपलब्ध झाला व गांजा व तो पिण्याचे साहित्य कारागृहात कसे पोहचले असा प्रश्न उपस्थित होत आहे. आहे. या प्रकारामुळे नाशिक कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून कारागृहाच्या सुरक्षेवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

यावर कारागृह अधीक्षकांनी मात्र हे व्हिडीओ जुने असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही वर्षांपासून कैद्यांसाठी सकारात्मक उपक्रम राबवले जात आहेत. हे पाहून काही आत्मसंतुष्ट व्यक्तींनी जुन्या क्लिप्स मुद्दाम व्हायरल केल्याचे कारागृह अधीक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान हे फोटो आणि व्हिडीओ नेमके केव्हाचे आहेत. खरोखरच नाशिकरोड कारागृहातीलच आहेत का? याबाबत चौकशी केली जात आहे.

Nashik Jail Viral Video
Nashik Voter List Scam : खोलीत राहतात तिघे, मतदार यादीत 813 व्यक्ती! निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, संकेतस्थळ हॅक की घोटाळा?

काही कैदी सुट्टीवरून पुन्हा कारागृहात परत येताना तंबाखू आणि ड्रग्जसारखे पदार्थ प्लास्टिकमध्ये लपवून कारागृहात आणतात. मातीची चिलीम वापरुन हे पदार्थ सेवन केले जातात. इतकेच नव्हे तर चार्जिंगसाठी मोबाईल कसा वापरला जातो, त्यामागे कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का? हेही तपासले जात आहे. यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार असून त्याबाबत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

धक्कादायक म्हणजे मंगळवारी तर एका कैद्याने कारागृहाती शिपायावरच हल्ला केला. बंदीवान बिलाल अली हुसेन शेख याने कारागृहातील शिपाई भाईदास भोई यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Jail Viral Video
Simhastha Kumbhmela: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरांवर सरकारी बुलडोझर...कारवाई थांबवण्यास प्रशासनाचा नकार!

नाशिक मध्यवर्ती कारागृहात अशा प्रकारे कैद्यांकडून नियमांचा भंग करण्याचा प्रकार काही पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वीही कैद्यांकडून कारागृहात मोबाईल वापराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. २०१६ मध्ये काही कैद्यांकडे मोबाईल आढळून आले होते. त्यावेळी तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com