Nashik NCP News : सत्ता उपभोगलेले भुजबळ पवारांवर टीका करतात, हे हास्यास्पद!

Nashik will remain Sharad Pawar`s stronghold-राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.
Mehboob Shaikh
Mehboob ShaikhSarkarnama

Mehboob Shaikh News : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांना मानणारा व त्यांचाच बालेकिल्ला राहील, असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केला. (NCP Youth president Mehboob Shaikh criticized rebel group)

शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील (Nashik) कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

Mehboob Shaikh
Nashik Congress News : शांततापूर्ण मराठा आंदोलकावंरील लाठीहल्ला ही कोणती नैतिकता?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदग्रहण व प्रवेश कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष शेख उपस्थित होते.

यावेळी श्री. शेख यांनी सरकारमध्ये सामील झालेल्या फुटीर गटाचे नेते काहीही दावा करीत असले, तरीही सरकारमध्ये त्यांचे स्थान काय आहे, याची त्यांना जाणीव होऊ लागली आहे. सत्ताधारी गट फक्त त्यांचा राजकीय वापर करून घेत आहे. जनतेचे कोणतेही प्रश्न सोडविण्याची मानसिकता या सरकारमध्ये नाही. ते त्यांनीच बनवलेल्या जाळ्यात अडकतील.

Mehboob Shaikh
Manoj Jarange News : मनोज जरांगे उपोषण सोडणार का ? संपूर्ण राज्याचं लागलं लक्ष !

ते पुढे म्हणाले, राज्यात सामान्य नागरिक, शेतकरी तसेच युवकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचे सरकारला काहीही देणे घेणे राहिलेले नाही. ते फक्त आगामी लोकसभा निवडणुकीत आपली पत कशी वाचेल याच्याच विचारात आहेत. त्यासाठी ते अन्य पक्षांना फोडत आहेत. मात्र जनता निष्ठावंतांबरोबर राहील. शरद पवार हे राज्याचे नेते आहेत.

शेख म्हणाले, राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक संघटन बळकट करण्याचे काम सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांना धोका दिला, त्यांना धडा शिकविण्यासाठी युवकांमध्ये जनजागृती व्हावी. वीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली ज्यांना उपमुख्यमंत्री केले, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते अशी पद भोगली तेच भुजबळ आता पवारांवर टीका करू लागले आहे. येणाऱ्या काळात त्यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना नक्कीच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

Mehboob Shaikh
Jitendra Awhad News : सावध रहा, संविधान बदलण्याचा भाजपचा डाव!

प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, नाशिक शहर सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस शदाब सय्यद, प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार, प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संकेत गायकवाड, जिल्हा महिला अध्यक्ष संगीता पाटील, प्रदेश पदाधिकारी अतुल पाटील, दिनेश धात्रक, गोरख ढोकणे महिला शहराध्यक्षा अनिता दामले, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com