Manoj Jarange News : मनोज जरांगे उपोषण सोडणार का ? संपूर्ण राज्याचं लागलं लक्ष !

Manoj Jarange Maratha Reservation : "मराठा आंदोलकांवरील गुन्हे ही मागे घ्या.."
Manoj Jarange News :
Manoj Jarange News : Sarkarnama
Published on
Updated on

Jalna News : जालन्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या मनोज जरांगेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर बुधवारी राजकीय हालचालींनी वेग आल्याचे पाहायला मिळाले. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने चर्चा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांबाबत आजच आदेश काढण्यात येणार आहेत, अशी शक्यता आहे. त्यामुळे आज जरांगे हे उपोषण मागे घेणार का ? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Manoj Jarange News :
Maratha Reservation Protest : मराठा आंदोलनाचा 'इम्पॅक्ट'! सरकार आरक्षणासाठी विधेयक आणण्याच्या तयारीत ?

मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या मराठा समाजातील लोकांकडे निजामकालीन कुणबीच्या नोंदी आहेत, त्यांना कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ज्यांच्याकडे कुणबीच्या नोंदीचे पुरावे आहेत, त्या सर्वांना यापुढे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केले.

Manoj Jarange News :
Manoj Jarange Arakshan : उपोषणाचा नववा दिवस; मनोज जरांगेची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी लावले सलाईन...

मराठा आरक्षणासाठी झालेल्या मंत्रिमंडळात आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला. आरक्षणासाठी चाचपणीसाठी आता आणखी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती निवृत्त न्यायाधीशांची असून, यात पाच सदस्य असणार आहेत. ही समिती कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी लागणारे सर्व पुरावे, कागदपत्रांची तपासणी करणार आहे. तसेच आरक्षणासाठी पूर्वी स्थापन केलेली समिती या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीला मदत करणार आहे. (Maharashtra Political News)

Manoj Jarange News :
Ambadas Danve On Sandipan Bhumre : तुमची अगरबत्ती मध्येच कुठे ओवाळतायं ? मराठा समाज तुम्हालाच घरी बसवणार; भुमरेंना दानवेंचा टोला..

मंत्रिमंडळात घेतलेल्या या दोन निर्णयांवर आज जीआर काढणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. याची माहिती उपोषणकर्ते मनोज जरांगेंना माजी मंत्री खोतकर आणि टोपे यांनी दिली. 'सरकार चार पावले पुढे आले असून, जरांगेंनीही सहकार्य करण्याच्या भावनेतून निर्णय घ्यावा', असे आवाहन अर्जुन खोतकरांनी केले.

यावर मराठा 'समाजातील ज्या लोकांना कुणबी वंशावळीच्या नोंदी दाखवता येणार नाही, त्यांनाही प्रमाणपत्र द्यावे', असे जरांगे यांनी सुचवले. तर मुख्यमंत्र्यांच्या घोषणांवर आज गुरुवारी सकाळी ११ वाजता निर्णय घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. यामुळे आज ते आपला उपोषण मागे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com