Nashik Zilla Parishad : शिक्षकांना कधी कोणतं काम लागेल, याचे नेम नाही. अतिरीक्त कामाची शिक्षकांना नेहमीच धास्तीच असते. आता लवकरच केंद्र सरकारच्या जनगणनेचे काम सुरू होणार आहे. तत्पूर्वी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बीएलओचं काम पूर्ण झालं. पण नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशानुसार शिक्षक, मुख्याध्यापकांना भटक्या कुत्र्यांच्या उपाययोजनांसाठी जिल्हास्तरावरून नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलं आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या या आदेशावरून नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आदेश काढताना, जिल्हा परिषद, नगरपालिका, सरकारी, खासगी, अनुदानित, अशंतः अनुदानित, खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित शाळा शिक्षक अन् मुख्याध्यापकांना हा आदेश काढला आहे. कार्यवाहीसाठी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, प्रशासन अधिकारी, महापालिका नाशिक आणि मालेगाव यांना सूचना केल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा दाखल नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले आहे. भटक्या जनावरांमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव तसेच मानव व श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. यानुसार शाळांच्या मुख्याध्यापकांना जिल्हास्तरावरून नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.
नियुक्त नोडल अधिकारी तथा मुख्याध्यापक यांनी कार्यवाही करावी यासाठी नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुमोटो याचिकेच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या या आदेशामुळे मुख्याध्यापकांवर कुत्रे मोजण्याची वेळ आली, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षकांना आलेल्या आदेशावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आता भटके कुत्रे मोजण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांवर! नाशिक जिल्हा परिषदेचा अजब फतवा, असे म्हणत, त्यांनी या आदेशाकडे लक्ष वेधलं आहे.
प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत, आपला भारत देश, जसा काय जगात एक नंबरला पोहोचलाय, आता मुलांना शिक्षण देण्यासारखे काहीच शिल्लक नाही. आता शिक्षकांना काय काम द्यावे, या विवंचनेत सरकार दिसतंय! असा खोचक टोला सत्यजीत तांबे यांनी आदेश एक्सवर पोस्ट करत सरकारला लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.